Uddhav  thackeray
Uddhav thackeray Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

पीक कर्ज व्याजावरील परतावा सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

टीम ॲग्रोवन

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधला. योजनांचा लाभार्थींना कसा फायदा झाला याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लाभार्थींशी बोलले. यावेळी लाभार्थींना येणाऱ्या अडचणी आणि अपेक्षा संवादातून समजून घेतल्या.

योजना केंद्राच्या असो वा राज्यांच्या असो, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. योजना राबवताना पक्षभेद विसरून आणि राजकारण बाजूला सारून काम झाले पाहिजे. मला आनंद आणि समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजनातून यशस्वी पोचवल्या जातात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचाही 40 टक्के वाटा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. पीक कर्ज व्याजावरील दोन टक्के परतावा देण्याची योजना केंद्र सरकारने बंद केली आहे. केंद्र सरकारकडून या पुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज व्याजावरील दोन टक्के परतावा दिला जाणार नाही. कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना केंद्र सरकारने बंद केलेला पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा पुन्हा सुरू करावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील योजनांच्या लाभार्थीशी सहयाद्री अतिथीगृहातून संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. पुढे ते म्हणाले,”केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येते.”

“प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात ५,००,००० घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत. ३५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे. २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशनमध्ये १९ लाख कुटुंबास नळ जोडणी व पिण्याचे शुद्ध पाणीपुरवठा देण्यासाठी १९०० कोटी इतका निधी उपलब्ध करू दिला आहे,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT