Takari Irrigation Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Irrigation Scheme : ‘ताकारी’च्या निधीचा मार्ग मोकळा ः डॉ. कदम

दुष्काळी भागाला वरदान ठरलेली ताकारी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय अहवालास शासन मान्यता मिळाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

टीम ॲग्रोवन

कडेगाव, जि. सांगली ः ‘‘दुष्काळी भागाला (Drought Area) वरदान ठरलेली ताकारी उपसा सिंचन योजना (Takari Irrigation Scheme) पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय अहवालास शासन मान्यता मिळाल्याने निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे.

येत्या दोन वर्षांत उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण व्हावी आणि संपूर्ण २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यावे, या साठी मी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे,’’ अशी माहिती आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली. कदम म्हणाले, ‘‘माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम हे १९८५ ला आमदार झाले. तेव्हापासून ताकारी योजनेला निधी देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले.

सुरुवातीची ताकारी योजना ८० कोटींची योजना होती. यानंतर खर्च वाढत गेला. आता ताकारी म्हैसाळ योजनेचा ८ हजार २७२ कोटी इतक्या खर्चाचा पाचवा सुधारित प्रशासकीय अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाला आणि त्याचा नुकताच अध्यादेशही निघाला आहे. यात योजनेसाठीचा १३२२ कोटींचा सुधारित प्रशासकीय अहवाल समाविष्ठ आहे.

खर्च झालेला ९५० कोटींचा निधी वजा जाता आता जवळपास ३७२ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. या योजनेसाठी आजवर ९५० कोटी इतका निधी खर्च झाला आहे. पूर्णत्वासाठी ३७२ कोटींची गरज आहे.

यापैकी या वर्षी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी मिळावा व कामे तत्काळ मार्गी लागावी, यासाठी मी प्रयत्नशील आहे.’’ ‘‘वितरिकांचे अस्तरीकरण आणि बंदिस्त पाइपलाइनसाठी २०५ कोटी ५१ लाख इतका अंदाजित खर्च होईल,’’ असे डॉ. कदम यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT