Education Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Education Loan : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मिळणार १५ लाखांच कर्ज ; व्याजाचा दर ४ टक्के

या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी १० वर्षांचा असून नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड असणार आहे.

Team Agrowon

Educational Loan For Suicide Farmers Children : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी राज्य सरकराने योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’असे या योजनेचे नाव आहे.

महाराष्ट्र सहकारी बँकेने सुरू केलेल्या या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते बुधवारी (ता.१७) करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. शून्य ते चार टक्के व्याजदराने १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या मिळवता येणार आहे.

नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी १० वर्षांचा असून नोकरी लागल्यानंतर कर्जाची परतफेड असणार आहे.

कर्जाचे नियम

या योजनेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पदवीच्या शिक्षणासाठी कर्ज मिळणार आहे. यामध्ये पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारण आणि जामीनदारांची आवश्यकता असणार नाही.

तसेच पाच लाख ते १० लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र अर्जदाराला कर्जासाठी एका जामीनदाराची आवश्यकता असेल. १० लाख ते १५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागणार आहे. तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल.

असे असणार व्याजाचे दर

५ लाखांपर्यंत शुन्य टक्के, पाच लाख ते १० लाखांपर्यंत २ टक्के तर १० लाख ते १५ लाखापर्यंत ४ टक्के व्याजदर लागणार आहे. असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माहीती दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT