Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ आंबिया बहरातील फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई, स्ट्रॉबेरीला लागू

पुणे : पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत (PM Crop Insurance Scheme) पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ आंबिया बहरातील फळपिकांसाठी (Fruit Crop) लागू करण्यात आली आहे. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्त्वावर) या ९ फळपिकांचा समावेश आहे.

या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पंतप्रधान पीकविमा योजना कर्जदार, बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे.

जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. एका शेतकऱ्यास मृग व आंबिया बहर मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहील. द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये, मोसंबीसाठी ८० हजार रुपये, केळीसाठी १ लाख ४० हजार रुपये, पपईसाठी ३५ हजार रुपये असून या तिन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.

संत्रासाठी ८० हजार रुपये, काजूसाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख रुपये, तर गारपिटीसाठी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार ३३३ रुपये असून दोन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

आंबा फळपिकासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत कोकणातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३० नोव्हेंबर, तर इतर जिल्ह्यातील आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२२ असून, दोन्हीसाठी विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये, तर गारपिटीसाठी विमा संरक्षित रक्कम ४६ हजार ६६७ रुपये इतकी आहे.

डाळिंब, स्ट्रॉबेरीसाठी १४ जानेवारी अंतिम मुदत डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये, तर गारपिटीसाठी विमा संरक्षित रक्कम ४३ हजार ३३३ रुपये, स्ट्रॉबेरी फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२३ असून विमा संरक्षित रक्कम २ लाख रुपये, तर गारपिटीसाठी विमा संरक्षित रक्कम ६६ हजार ६६७ रुपये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bopodi Land Dispute: बोपोडीतील वादग्रस्त जमीन पूर्णतः शासकीय मालकीची

Yashwant Factory Land Scam: ‘यशवंत’ जमीन विक्री व्यवहार ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर

Ai in Agriculture: ऊस उत्पादकता वाढीत ‘एआय’चे मोठे योगदान

Canal Committee Meeting: कालवा सल्लागार समिती बैठकीला आचारसंहितेचा अडसर

Rabi Crop Competition: रब्बी हंगामातील अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीकस्पर्धा

SCROLL FOR NEXT