Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : नुकसानीच्या २५ टक्के आगाऊ पीकविमा मंजूर

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार २५ टक्के आगाऊ परतावा शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेला विमा कंपनीने नुकतीच मंजुरी दिली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : अतिवृष्टीमुळे (Wet Drought) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Abhijeet Raut) यांनी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनुसार २५ टक्के आगाऊ परतावा शेतकऱ्यांना देण्याची अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेला विमा कंपनीने (Crop Insurance) नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहा लाख विमाधारक शेतकऱ्यांना जवळपास ४१० कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात सततचा पाऊस तसेच अनेक मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, खरीप ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे विमा कंपनीकडून आगाऊ परतावा शेतकऱ्यांनी देण्याची मागणी करण्यात येत होती. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना लागू केली होती.

या अधिसूचनेद्वारे सर्वच ९३ महसूल मंडलांतील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात २५ टक्के रक्कम आगाऊ देण्यात येते. त्याअनुषंगाने गुरुवारी (ता. २०) जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये विमा कंपनीस दिलेल्या निर्देशानुसार चार पिकांसाठी विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले. यामुळे नांदेड जिल्ह्यास जवळपास ४०० कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे परतावा मंजूर

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना भरपाईसाठी आगाऊ २५ टक्के परतावा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीच्या संपर्कात राहून पाठपुरावा केला. यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून आगाऊ ४०० कोटींवर परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT