PM Kisan Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘पीएम किसान’साठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

सद्यःस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील एकूण एक लाख १५ हजार ७१९ लाभार्थींची बँक खाती आधार संलग्नित करणे प्रलंबित आहे.

Team Agrowon

Solapur News : माहे डिसेंबर २०२२ ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थींनी त्यांचे बँक खाते आधारशी (Bank Aadhar linking) जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले आहे.

श्रीमती पवार म्हणाल्या, की बँक खाती आधार संलग्न करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थींची इंडिया पोस्ट पेमेंट्‍स बँकेत खाती उघडण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश असून, गाव पातळीवरील भारतीय डाक विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कृषी, ग्रामविकास विभागाच्या साहाय्याने तहसीलदारांनी आवश्यक कार्यवाही करावी.

सद्यःस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील एकूण एक लाख १५ हजार ७१९ लाभार्थींची बँक खाती आधार संलग्नित करणे प्रलंबित आहे.

केंद्र शासनाने २४ जानेवारीच्या दूरचित्रवाणी परिषदेमध्ये बँक खाती आधार संलग्न केलेल्या लाभार्थींनाच डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील १३ व्या हप्त्याचा लाभ अदा होणार असल्याचे यापूर्वीच कळविले आहे.

बँक खाती आधार संलग्न करणे प्रलंबित असलेल्या लाभार्थींची इंडिया पोस्ट पेमेंट्‍स बँकेत खाती उघडण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत.

या अनुषंगाने राज्याचे कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान यांनी दिलेल्या निर्देशानुसार गाव पातळीवरील भारतीय डाक विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कृषी, ग्रामविकास विभागाच्या साह्याने तहसीलदारांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT