Crop Insurance
Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्याचे १२०० कोटी लवकरच मिळणार

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यात अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान (Kharif Crop Damage) झालेल्या पीकविमाधारक शेतकऱ्यांना (Insurance Holder Farmer) १२०० कोटी रुपयांची भरपाई (Crop Damage Compensation) मिळण्यासाठी पाच विमा कंपन्यांकडून (Crop Insurance Company) युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पंतप्रधान पीकविमा योजनेतील पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईच्या रकमा लवकरात लवकर जमा कराव्यात, अशा सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत. २१ नोव्हेंबरअखेर राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती गटांच्या अंतर्गत पीकविम्यापोटी मंजूर झालेल्या नुकसान भरपाईची एकूण रक्कम २१४८ कोटी रुपये इतकी आहे.

मात्र त्यापैकी आतापर्यंत विमा कंपन्यांनी २४.९१ लाख शेतकऱ्यांना केवळ ९४२ कोटींची नुकसान भरपाई वाटली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप १२०५ कोटी रुपयांची भरपाई मिळालेली नाही. त्यासाठी विमा कंपन्यांकडे कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या १२.२० लाख पूर्वसूचनांबाबत विमा कंपन्यांनी अद्याप नुकसान भरपाई निश्‍चित केलेली नाही. मात्र कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी या कामकाजाला लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीकडून ९६७.३० कोटी रुपये, तर ५.७४ कोटी रुपये एचडीएफसी इर्गो विमा कंपनीकडून मिळणे बाकी आहे. याशिवाय ४९.२५ कोटी रुपये आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीकडून, १६६.५२ कोटी रुपये युनायटेड इंडिया विमा कंपनीकडून तर बजाज अलियान्झ विमा कंपनीकडून १६.८४ कोटी रुपये अद्याप वाटले गेलेले नाहीत.

राज्यातील विमा कंपनीनिहाय भरपाई वाटपाची स्थिती ः (आकडे कोटी रुपयांमध्ये)

कंपनीचे नाव–किती भरपाई वाटायला हवी–किती भरपाई वाटली–किती रक्कम वाटलेली नाही

भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) –११२६.७१—१५९.४१– ९६७.३०

एचडीएफसी इर्गो —१५३.३०—१४७.२६–५.७४

आयसीआयसीआय लोंबार्ड –२८०.५३–२३१.२८–४९.२५

युनायटेड इंडिया –४७६.५२–३१०–१६६.५२

बजाज अलियान्झ –११०.९४–९४.१०–१६.८४

स्थानिक नैसर्गिक आपत्ती गटातील विमा दाव्यांची स्थिती

-शेतकऱ्यांनी दिलेल्या पूर्वसूचना ः ५२००१९५

-यातील सर्वेक्षण पूर्ण झालेल्या पूर्वसूचना ः ५०४१३५०

-प्रलंबित पूर्वसूचनांची संख्या ः १५८८४५

-आतापर्यंत निश्‍चित केलेली भरपाई ः १४४६.३५ कोटी रुपये

-भरपाई निश्‍चित न झालेल्या पूर्वसूचनांची संख्या ः १२२०८३१

-नुकसान भरपाई मिळालेल्या पूर्वसूचना ः १११०९१३

-वाटलेली नुकसान भरपाई ः ४३३.२० कोटी रुपये

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती गटातील विमा दाव्यांची स्थिती ः (रक्कम कोटी रुपयांमध्ये)

-अधिसूचना काढलेले जिल्हे ः १६

-कंपन्यांनी आक्षेप घेतलेले जिल्हे ः अकोला, अमरावती, सोलापूर

-नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी ः १६२३०८९

-निश्‍चित केलेली नुकसान भरपाई ः ७०१.६४ कोटी रुपये

-भरपाई मिळालेले शेतकरी ः १३८०३७२

-शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली भरपाई ः ५०९.१५ कोटी रुपये

काढणी पश्‍चात नुकसान भरपाई गटातील विमा दाव्यांची स्थिती ः

शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या पूर्वसूचना ः ५६८८८५

सर्वेक्षण पूर्ण झालेल्या पूर्वसूचना ः ४९७०६३

सर्वेक्षणासाठी प्रलंबित पूर्वसूचना ः ७१८२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT