PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘शेतकरी सन्मान’चे राज्यात १ कोटी १० लाख लाभार्थी

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यात एकूण १ कोटी १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण ११ हप्त्यांत २० हजार २३५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद ः ‘‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) राज्यात एकूण १ कोटी १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण ११ हप्त्यांत २० हजार २३५ कोटी रुपये जमा झाले आहेत. ११ लाख ३९ हजार नवीन लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे,’’ अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिली.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसंबंधीची दूरदृश्‍यप्रणालीद्वारे बैठक बुधवारी (ता.३१) झाली. या वेळी सत्तार बोलत होते. सत्तार, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, सांख्यिकीय विभागाचे गणेश घोरपडे यांच्यासह विविध राज्यांतील कृषिमंत्र्यांची उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, ‘‘राज्यातील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी ग्राम पातळीवर मोहीम राबविली जात आहे. आजवरच्या कालावधीत ४ लाख ४२ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यात आले आहे. उर्वरित ३९ लाख १३ हजार लाभार्थ्यांशी संपर्क करून त्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण १०० टक्के करून घेत आहोत. शेतकऱ्यांचा डाटा बेस तयार करणे सुरू आहे. ११ लाख ३९ लाभार्थ्यांचा डाटा अपलोड केला आहे.’’

ई- केवायसीला मुदतवाढ

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेत समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व राज्यांच्या मागणीनुसार, ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे तोमर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT