Fig farming, Anjeer farming in Marathi
Fig farming, Anjeer farming in Marathi Agrowon
संपादकीय

Food Processing : प्रक्रियाच तारेल शेतीला

टीम ॲग्रोवन

आपल्याकडे ब्रेडला लावून प्रामुख्याने जाम, बटर, चीझ, केचअप असे विविध कंपन्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. आता यात एका नवीन पदार्थाची भर पडली आहे. पुरंदर हायलॅंड शेतकरी उत्पादक कंपनीने (Purandar Highland Farmer Producer Company) अंजिरापासून ब्रेड स्प्रेड (Fig Bread Spreader) तयार केला असून, त्याची विक्री ॲमेझॉनवर (Fig Bread Spreader On Amazon) ऑनलाइनच्या माध्यमातून केली जात आहे. अंजीर या फळपिकाला भौगोलिक मानांकन (GI Tag For Fig) (जीआय) मिळाले आहे. या उत्पादक कंपनीने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून अंजीर खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून ब्रेड स्प्रेड बाजारात आणला आहे.

या नव्या उत्पादनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. खरे तर जीआय मानांकनप्राप्त शेतीमाल उत्पादनांचा आकडा राज्यात २५ च्या वर आहे. तसेच जीआय मानांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत राज्यातील अनेक शेतीमाल उत्पादने असून, लवकरच हा आकडा वाढणार आहे. असे असताना जीआय मानांकनप्राप्त अनेक शेतीमाल उत्पादने मूल्यवर्धन, प्रक्रियेत मागे असल्याने त्या उत्पादनाबरोबर उत्पादकांचा देखील विकास झालेला नाही. अंजिरापासून पोळी, जॅम, बर्फी, कॅंडी, सुके अंजीर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. परंतु प्रक्रियेसाठी उपयुक्त अंजीर जाती आपल्याकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुरंदरसह राज्यातील इतर भागांत पिकविलेल्या अंजीर उत्पादकांना ताज्या फळांच्या स्वरूपात विकावी लागतात. अशा ताज्या अंजीर फळांना चांगला दर मिळत नाही. शिवाय ताज्या अंजीर फळांची टिकाऊक्षमता कमी असल्याने मिळेल त्या दरात ती विकावी लागतात.(Anjeer processing information)

तुर्की देशाने पर्यटन आणि प्रक्रिया उद्योगातून जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. या देशातील बुरसा प्रांत फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या प्रांतात प्रामुख्याने अंजीर, चेरी आणि ऑलिव्हची लागवड पाहावयास मिळते. या देशातील इझमिर हे शहर अंजीर प्रक्रियेचे आगार मानले जाते. या देशाने आपल्या वातावरणाशी आणि प्रक्रियेस अनुकूल अंजीर जाती निर्माण केल्या. प्रक्रियायुक्त सुक्या अंजिरासाठी सारीलॉप, तर ताज्या अंजिरासाठी बुरसा ब्लॉक या जाती निर्माण केल्या आणि दर्जेदार ताजी अंजीर फळे तसेच सुके अंजीर यांची जगभर निर्यात करीत आहेत.

सध्या आपल्या देशात कोणत्याही शेतीमालास योग्य दर मिळत नाही. अशावेळी शेतीमालाचे मूल्यवर्धन अथवा प्रक्रियाच शेतीला तारणार आहे. त्यामुळे अंजीर असो की इतर कुठलाही शेतीमाल त्यांच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त जाती विकसित कराव्या लागतील. या देशातील संशोधकांनी हे लक्षात घेऊन कामाला लागायला हवे. सध्या क्लस्टरनिहाय उपलब्ध विविध प्रकारच्या शेतीमालावर प्रक्रिया कमीच होते. येथून पुढे शेतीमाल प्रक्रियेचेच युग असणार आहे. प्रत्येकाला खाण्यास तयार प्रक्रियायुक्त पदार्थ हवे आहेत. त्यामुळे आपल्या भागात पिकत असलेल्या शेतीमालावर अधिकाधिक प्रमाणात प्रक्रियेसाठी तरुण शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या यांनी पुढे यायला पाहिजेत.

अंजिरापासून ब्रेड स्प्रेड तयार करून ‘पुरंदर हायलॅंड’ने राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक चांगला आदर्श घालून दिला आहे. शेतीमाल प्रक्रियेमध्ये अडचणी आहेत. परंतु ध्येय पक्के असेल, कामात सातत्य असेल तर यश नक्की मिळते, हे पुरंदर हायलॅंड या शेतकरी उत्पादक कंपनीने दाखवून दिले आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकऱ्यांपासून ते शेतकरी गट, महिला गट, कंपन्या यांनी शेतीमाल प्रक्रियेत आता पुढे यायला पाहिजेत. शेतकरी गट, कंपन्या यांना शेतीमाल प्रक्रियेसह पीकनिहाय एकंदरीतच मूल्यसाखळी विकासात शासनाचे पण चांगले पाठबळ आहे. प्रक्रियेने शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला दर मिळतो. उत्पादित मालाची नासाडी कमी होते. गावपरिसरात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT