Citrus Crop Management  Agrowon
इतर

Mahaorange : अधिस्वीकृती शुल्क कपातीसाठी ‘महाऑरेंज’चा ठराव

Citrus Crop Nursery : दर्जेदार रोपनिर्मितीसाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने त्यांच्याकडील तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र याचे शुल्क जास्त असल्याने त्याला रोपवाटिकाधारकांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे वास्तव आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : दर्जेदार रोपनिर्मितीसाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने त्यांच्याकडील तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र याचे शुल्क जास्त असल्याने त्याला रोपवाटिकाधारकांचा प्रतिसादच मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘महाऑरेंज’ने एक ठराव घेत हे शुल्क एक लाख रुपयांपर्यंत कमी करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेद्वारे किडरोगांचा कमी प्रादुर्भाव होण्याच्या उद्देशाने निरोगी रोपनिर्मितीसाठी खास तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामध्ये मातीचे निर्जंतुकीकरण व इतर तांत्रिक बाबींचा समावेश आहे. त्यामुळेच ‘एनआरसीसी’च्या रोपांना देशभरातून मागणी राहते. परंतु इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोपांचे उत्पादन करण्याची क्षमता नसल्याने ‘एनआरसीसी’कडून त्यांच्याकडील तंत्रज्ञान खासगी रोपवाटिकांधारकांना देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी सूचना केली होती. परंतु खासगी रोपवाटिकाधारकांना अधिस्वीकृती देण्यासाठी सुरवातीला दहा लाख रुपयांचे शुल्क आकारले जात होते. त्यामुळे रोपवाटिकाधारकांचा त्यास प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी हे शुल्क कमी करावे, अशी मागणी होत होती.

दरम्यान, ‘महाऑरेंज’ने हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. गडकरी यांनी देखील शुल्क एक लाख रुपये करावे, अशी सूचना केली. परंतु तज्ज्ञांचे दौरे व तांत्रिक मार्गदर्शन यावर खर्च होत असल्याने ‘एनआरसीसी’ने शुल्ककपातीस नकार दिला. उलट दहा लाखांवरून ते १२ लाख रुपये शुल्क केले. आता हे शुल्क कमी करावे, यासाठी ‘महाऑरेंज’ने त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीतच ठराव घेतला आहे.

रोपवाटिका अधिस्वीकृतीसाठी ‘एनआरसीसी’कडून सुरुवातीला दहा लाख व आता १२ लाख रुपये शुल्क आकारले जात आहे. ते कमी करावे, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी १५ जुलै २०२३ रोजीच्या महाऑरेंज संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव घेण्यात आला. हा ठराव आता ‘एनआरसीसी’ व इतर यंत्रणांना पाठविण्यात येईल.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Jantar Mantar Protest: विद्यार्थ्यांचे जंतर-मंतरवरील आंदोलन मागे, 'सीजेपी'च्या ३ मागण्या सरकारकडून मान्य

Ahilyadevi Holkar Karjmukti : साताऱ्यातील ५३ हजार ७३६ खात्यांची माहिती अपलोड

Agriculture Water Crisis: जलसंकटाच्या तीव्रतेत यंदा ३३ टक्क्यांनी वाढ

Farmer Loan Waiver List : दोन लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी अपलोड

Kolhapur Sowing Update: कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पेरणी ७१.३७ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT