assembly speaker
assembly speaker 
मुख्य बातम्या

या अधिवेशनात मिळणार विधानसभेला अध्यक्ष ? 

टीम अॅग्रोवन

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) ही आवाजी पद्धतीने व्हावी, यावरून सत्ताधारी (Ruling Party) आणि विरोधकांमध्ये (Opposition) मोठा गदारोळ बघायला मिळाला होता. मात्र, आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. पण त्यावर राज्यपाल (Governor) काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभा अध्यक्षांची जागा अद्याप रिक्त आहे. आजवर अध्यक्षाविना तीन अधिवेशने (Assembly Session) पार पडली आहेत. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी अध्यक्षांची खुर्ची रिक्त नसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षाविनाच पार पडले होते. अध्यक्षांच्या निवडणुकीवरून भाजप नेते सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहेत.

विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पेच आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुटण्याची शक्यता आहे. कारण आगामी अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अवगत केले जाईल. राज्यपालांना तारीख सांगितली जाईल, याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

व्हिडीओ पाहा -

विधानसभा नियमाच्या कलम ६ नुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्याचे अधिकार राज्यपालांकडे आहेत. राज्य मंत्रिमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला जातो. तो मान्य करून राज्यपाल निवडणुकीची तारीख निश्चित करतात व त्या दिवशी निवडणूक घेतली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पद्धती अवलंबली जातेय व त्याबाबत कधी पेच निर्माण झाला नव्हता. पण गेल्या काही वर्षांत राजकारण बदलून गेलेय.

दरम्यान, अध्यक्षपद कॉंग्रेसच्या वाट्याला आलेले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस कोणाची निवड करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या यापूर्वी  भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आदी नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आले होते. आता पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT