Urad Market Rate Agrowon
मुख्य बातम्या

Udid rate : खानदेशात उडीद दर दबावात ; दर प्रतिक्विंटल ४५०० ते ६९०० रुपये

Udid market rate : खानदेशातील बाजारांत उडदाची आवक कमी आहे. परंतु दरांवर मागील काही दिवसांत दबाव वाढला असून, दर्जाचे कारण पुढे करून कमी दर दिले जात असल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील बाजारांत उडदाची आवक कमी आहे. परंतु दरांवर मागील काही दिवसांत दबाव वाढला असून, दर्जाचे कारण पुढे करून कमी दर दिले जात असल्याची स्थिती आहे. दर आठ हजार ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटल वरून किमान ४५०० ते कमाल ६९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत.

खानदेशात कडधान्य किंवा उडीद, मुगासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, चोपडा, चाळीगाव, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. चोपडा, जळगाव येथील बाजार समितीत मागील पंधरवड्यात किंवा सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात उडदाचे दर साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपये व सरासरी नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल, होते. परंतु मागील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस झाल्यानंतर उडीद दरात घसरण सुरू झाली. दर आता किमान ४५०० तर कमाल ६९०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. दर्जेदार उडदाचे दर ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. परंतु एवढे दर मोजक्याच शेतकऱ्यांना मिळत असल्याचे दिसत आहे.

चोपडा येथील बाजार समितीत उडदाची आवक कमीच आहे. तेथे मागील सात दिवस उडदाची प्रतिदिन २० क्विंटल एवढीच आवक झाली आहे. जळगाव, अमळनेर, चोपडा या बाजार समित्यांत मिळून उडदाची रोज १२० क्विंटल आवक झाल्याचे चित्र आहे. परंतु दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. खरेदीदार, अडतदार कमी दर्जाचे कारण सांगून कमी दर देत आहेत.

अनेक शेतकरी उडदाची मळणी करून त्याची वाळवणूक करून घेत आहेत. तो वाळवून व स्वच्छ करून बाजारात आणत आहेत. परंतु तरीदेखील दर सात हजार रुपयांवर नसल्याने नुकसान होत आहे. कारण खर्च अधिक लागत आहे. मळणी, कापणीचा खर्च एकरी पाच हजार रुपयांवर गेला आहे. उत्पादन यंदा एकरी अडीच ते तीन क्विंटल एवढेच येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT