Soybean
Soybean 
मुख्य बातम्या

Soybean market: सोयाबीन बाजार एका भावपातळीभोवती फिरतोय

अनिल जाधव

पुणेः मागील सप्ताहात सोयाबीन दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. शेतकऱ्यांनी यंदा कंट्रोल सेलिंग सुरु केलंय. त्यामुळं बाजारात सोयाबीन आवक अद्यापही अपेक्षेपेक्षा कमीच आहे. प्रक्रिया प्लांट्सना क्षमतेप्रमाणे माल मिळत नसल्याने सोयाबीन बाजार (soybean market) किमान भावपातळीवरून काहीसा सुधारला. जागतिक खाद्यतेल बाजारात मागील आठवड्यात वाढ पाहायला मिळाली. त्यातच देशांतर्गत बाजारात कच्च्या पामतेलाची (crud palm oil) काहीशी टंचाई जाणवली. परिणामी दरात सुधारणा झाली. परिणामी रिफाईंड सेगमेंटमधील तेलांना मागणी राहिली. मागील आठवड्यात देशभरातील बाजारांत दैनंदिन सरासरी आडीच लाख पोत्यांची आवक (soybean arrival) राहिली. मागील आठवड्यात दरात किमान पातळीवरून सुधारल्याने आवक तीन लाख पोत्यांवरही पोचली होती. हे ही वाचाः  देशातील तूर उत्पादनात मोठी घट मागील सप्ताहात सोयाबीनच्या किमान दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा झालीये. या वाढीसह मध्य प्रदेशात आठवड्यातील सरासरी दर ६ हजार ६ हजार ३५० रुपयांवर होता. तर महाराष्ट्रात ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले. तर राजस्थानमध्ये सोयाबीनला ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांदरम्यान दर मिळालाय. बाजार समित्यांसह प्लांट्सचे दरही १०० ते २०० रुपयांनी सुधारले. यावाढीसह मध्य प्रदेशात प्लांट्सचे दर ६ हजार ३५० ते ६ हजार ५५० रुपयांवर होते. तर महाराष्ट्रातील प्लांट्स दर ६ हजार ५७० ते ६ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान होते. राजस्थानमध्येही ६ हजार ६०० ते ६ हजार ७५० रुपयांवर सोयाबीनचे व्यवहार झाले.  मागील आठवड्यात देशभरात सोयापेंडचा बाजार सामान्य राहिला. स्थानिक बाजार आणि निर्यातीसाठी मागणी सामान्य होती. आठवड्यात सोयापेंड दरात ५०० ते १००० रुपयांचा चढ-उतार राहिला. मध्य प्रदेशात सोयापेंडचे दर ५३ हजार ५०० ते ५६ हजार रुपये प्रतिक्विंटलवर राहिले. महाराष्ट्रातही दर ५५ हजार ते ५८ हजार रुपयांच्या दरम्यान होते. राजस्थानमध्ये दर ५४ हजार ५०० ते ५५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान राहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT