Food Brand 
मुख्य बातम्या

'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेअंतर्गत ६ फूड ब्रँड लाँच

टीम ॲग्रोवन

पुणे - 'एक जिल्हा एक उत्पादन' (One District One Product) योजनेंतर्गत बुधवारी (ता. ५) सहा ब्रँडचे लाँचीग करण्यात आले. प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजनेंतर्गत १० ब्रँड एक जिल्हा एक उत्पादन ब्रँड म्हणून विकसित करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया ( Union Food Processing Ministry) मंत्रालयाने यासाठी नाफेडसोबत (NAFED) करार केला आहे. यापैकी सहा ब्रँडचे लाँचींग या अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पार, राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. 

महाराष्ट्रातील (Maharashtra) सोमदाना या (Somdana) ब्रँडसह अमृत फल, (Amrut Fal) कोरी गोल्ड, (Kori Gold) काश्मिरी मंत्रा, (Kashmiri Mantra) मधु मंत्रा (Madhu Mantra) आणि दिल्ली बेक्सचे होल व्हीट कुकीज (wheat cookies) अशा सहा ब्रँडचा यामध्ये समावेश आहे. सोमदाना हा ब्रँड महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादन संकल्पने अंतर्गत भरड धान्यांसाठी  विकसित करण्यात आला आहे. ग्लूटेन-मुक्त, लोह, फायबर आणि कॅल्शियमने समृद्ध असे नाचणीचे पीठ हे एक अद्वितीय उत्पादन आहे.  याच्या ५०० ग्रॅम पाकिटाची  किंमत ६० रुपये इतकी आहे.

तर आवळ्याच्या रसासाठी अमृत फल हा ब्रँड केवळ हरियाणातील गुरुग्रामसाठी जिल्हा एक उत्पादन संकल्पने अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. हे उत्पादन अनोखी चव आणि आरोग्यासाठी आहे. शुद्ध आवळ्याचा रस आणि लिंबूयुक्त नैसर्गिक अमृत असून याच्या ५०० मिली बाटलीची किंमत १२० रुपये एवढी आहे. कोरी गोल्ड ब्रँड धणे पावडरसाठी विकसित केला असून राजस्थानमधील कोटा जिल्ह्यासाठी ओळखले जाणारे एक जिल्हा एक उत्पादन आहे. या उत्पादनाला प्रादेशिक वैशिष्ट्यासह  एक वेगळी चव आहे. १०० ग्रॅम पाकिटाची  स्पर्धात्मक किंमत ३४ रुपये इतकी आहे.

व्हिडीओ पाहा - 

काश्मिरी मंत्रा या  ब्रँडच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममधील मसाल्यांचा अर्क उपलब्ध होणार आहे. जम्मू आणि काश्मीरसाठी एक जिल्हा एक उत्पादन  घटकांतर्गत मसाल्यांसाठी  काश्मिरी लाल मिर्ची उत्पादन विकसित करण्यात आले आहे. या उत्पादनाला एक वेगळी चव आहे आणि १०० ग्रॅम पाकिटाची  किंमत ७५ रुपये आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथील मधासाठी एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेअंतर्गत मधु मंत्रा ब्रँड विकसित करण्यात आला आहे. मुक्त क्षेत्रातील  मधमाश्यांनी गोळा केलेला हा मल्टीफ्लोरा मध असून या मधाच्या ५०० ग्रॅम काचेच्या बाटलीची किंमत १८५ रुपये आहे.

व्होल व्हिट कुकी हे दिल्ली बेक्स या ब्रँड अंतर्गत विकसित केलेले दुसरे उत्पादन आहे. एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेअंतर्गत दिल्लीसाठी हा ब्रँड आणि उत्पादन विकसित करण्यात आले आहे. नाफेडच्या मते संपूर्ण गव्हापासून तयार करण्यात येणारी त्याचप्रमाणे साखरेऐवजी गूळ आणि वनस्पती तुपाऐवजी लोणी वापरण्यात आलेली ही संपूर्ण गव्हाची बिस्किटे हे अनोखे उत्पादन आहे. ३८० ग्रॅम पाकिटाची स्पर्धात्मक किंमत १७५ रुपये आहे.

नाफेडने सांगितल्यानुसार ग्राहकांच्या फायद्यासाठी सर्व उत्पादने ओलावा आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणाऱ्या अनोख्या आणि आकर्षक पॅकेजिंगमध्ये येतात. यामुळे उत्पादनाचा वापरण्याचा दीर्घ कालावधी आणि ताजेपणा सुनिश्चित होतो. प्रत्येक उत्पादन हे नाफेडच्या विपणन कौशल्याचे विस्तृत ज्ञान आणि वारसा तसेच प्रक्रिया, पॅकेजिंग, पुरवठा आणि लॉजिस्टिक्समधील क्षमता आणि अनुभवाच्या आधारे विकसित केले गेले आहे. ही सर्व उत्पादने नाफेड बाजार, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि भारतातील प्रमुख किरकोळ दुकानांवर उपलब्ध असणार आहेत. 

आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. अन्न प्रक्रिया (Food Processing) उद्योगाच्या असंघटित विभागातील विद्यमान वैयक्तिक सूक्ष्म-उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे आणि या क्षेत्राच्या औपचारिकीकरणाला चालना देण्यासाठी आणि शेतकरी उत्पादक संस्था, बचत गट आणि उत्पादक सहकारी संस्थांना त्यांच्या संपूर्ण मूल्य साखळीत पाठबळ देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.  विद्यमान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या श्रेणीसुधारणेसाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्याच्या दृष्टीने दोन लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया कारखान्यांना थेट मदत करण्याची या योजनेची संकल्पना आहे. या योजनेअंतर्गत २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी १० हजार कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या २५ टक्के अग्रिमसाठी अधिसूचना

Flower Market : शेवंती, झेंडूचा भाव वधारला

Ativrushti Madat : ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टीसाठी ७ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर;  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मदतीची रक्कम

Paddy Crop Damage : परतीच्या पावसामुळे हळवी भातशेती धोक्यात

Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT