Sharad Pawar Agrowon
मुख्य बातम्या

Sharad Pawar Vs Ajit Pawar : वय आणि व्यक्तिगत हल्ले केले तर याद राखा ; शरद पवारांचा इशारा

NCP Crisis Live : राष्ट्रवादी काँग्रेसतील अजित पवार यांच्या बंड केल्यानंतर आज शरद पवार यांनी नाशिकपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. आज छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांनी हल्लाबोल केला.

Team Agrowon

Rashtrawadi Crisis : राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. त्यावर आज शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. 'तुमची तक्रार आमच्या धोरणांशी असेल, पण वय आणि व्यक्तिगत हल्ले केले तर याद राखा, अजून तुम्ही कुठं दम पाहिलायं', अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावले.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छगन भुजबळ यांनीही बंडखोरी केली. त्यांच्याविरोधात शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पहिली सभा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली.

या सभेच्या सुरुवातीला नाशिककरांनी शरद पवार यांना फुले पगडी देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह नाशिकमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता टीका केला. नाशिक जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी विचारांना साथ दिली. जो उमेदवार दिला त्याच्या बाजूने निकाल दिला. इथं माझा अंदाज चुकला. माझ्या अंदाजावर निकाल दिले. पण, माझ्यामुळे तुम्हाला यातना झाल्या असल्या तरी मी माफी मागतो. पुन्हा मी अशी चूक करणार नाही. योग्य निकाल लावणार, असे सांगितले.

राज्यात अनेक ठिकाणी पाणी, उद्योगधंद्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. राजकारण कशासाठी करायचे तर सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचे असते. आज आपल्यासमोर अनेक संकटे आहे. पण या जिल्ह्याने स्वाभिमानी कायम ठेवला. आतापर्यंत चुकीच्या गोष्टी झाल्या. त्या दुरुस्त केल्या पाहिजे, असे आवाहन पवारांनी नाशिककरांना केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT