Blackout
Blackout 
मुख्य बातम्या

`खाद्यपदार्थ, पाणी संपतेय आम्हाला वाचवा`

टीम अॅग्रोवन

नवी दिल्ली ः युक्रेनमधील सुमी या शहरामध्ये रशियन फौजा अक्षरशः आग ओकू लागल्या असून येथे अडकून पडललेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आज सोशल मीडियावरून व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारला(Central Government) सुटकेचे आवाहन केले आहे. आमच्याकडील खाद्यपदार्थ आणि पाणी देखील संपू लागले असून परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच सरकारने (government)आम्हाला येथून बाहेर काढावे असे आवाहन त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले . या विद्यार्थ्यांनी ठराविक कालावधीनंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत त्यातून त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. या विद्यार्थ्यांपैकीच एक असलेल्या महेक शेख या विद्यार्थिनीने याबाबतची आठ सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. सध्या शहरामध्ये पूर्ण ब्लॅकआउट(Blackout)असून वीज पूर्णपणे गेली आहे. बॉम्बस्फोटांमुळे पाण्याचा पुरवठा देखील खंडित झाला आहे. नेटवर्क देखील स्लो असल्याचे महेकने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. राधिका संगवान या विद्यार्थिनीने सूमी शहरामध्ये अजून सातशे ते आठशे विद्यार्थी अडकून पडल्याचा दावा केला असून त्यांच्या सुटकेबाबत मोठी अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले.

हे हि पहा : 

सूमीमधील बस, रेल्वेसेवा ठप्प झाली असून पूल देखील उद्ध्वस्त झाल्याने लोकांना नेमके जायचे कोठे? हेच समजेनासे झाले आहे. सगळे मार्ग बंद करण्यात आले असून दूतावासाकडून अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याने आमच्या चिंता वाढल्या असल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. येथील विद्यार्थ्यांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT