Organic Farming
Organic Farming 
मुख्य बातम्या

दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार करणार सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम

टीम ॲग्रोवन

दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद पाटीदार (Hukumchand Patidar) हे आता देशातील कृषी विद्यापीठांसाठी (Agriculture University) सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम (Organic Farming Sylabuss) तयार करणार आहेत. सेंद्रीय शेतीचा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या समितीमध्ये हुकूमचंद यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे आयसीएआरने (ICAR) ही स्थापन केली आहे. हुकूमचंद हे राजस्थानच्या (Rajsthan) झालवाड येथील मानपुरा गावचे रहिवासी आहेत. पारंपारिक आणि सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस पीक घेणाऱ्या हुकूमचंद यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकारने २०१८ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padmashri Award) सन्मानित केले आहे.  

केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. यासाठी सराकर वेगवेगळी धोरणंही राबवत आहे. सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी तज्ज्ञ आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश आयसीएआरने या समितीत केला आहे. ज्यामध्ये राजसथानच्या हुकूमचंद पाटीदार यांचाही समावेश आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून इम्फाळ कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अनुपम मिश्रा (Dr. Anupam Mishra) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय १४ जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती दोन महिन्यांत सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम विकसित करण्याबाबत आपला अहवाल देणार आहे.  

आतापर्यंत कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रीय शेतीवर आधारित (Organic Baced) स्वतंत्र अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता. आता सेंद्रिय शेतीसाठीच्या स्वतंत्र अभ्यासक्रमाचाही समावेश विद्यापीठांमध्ये करण्यात येणार आहे. ज्यामध्ये हुकूमचंद पाटीदार यांचे कृषी तंत्रज्ञनानही पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारकडून सेंद्रीय शेतीचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार केला जात आहे.  सेंद्रिय शेतीचा अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये सुरू केल्याने पारंपारिक आणि रसायनमुक्त शेतीला चालना मिळणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीमध्ये बीएस्सी, एमएससी आणि पीएचडी पदवीही मिळणार आहे.  

पाटीदार यांनी २००४ मध्ये सेंद्रिय शेती सुरू केली. तेव्हापासून ते सातत्याने सेंद्रिय शेती करतायत. पाटीदार यांनी सेंद्रिय शेतीमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली संत्री, डाळी, कांदा, कोथिंबीर, बडीशेप या पिकांना भारतासह तर युरोप ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, कोरिया या देशांमध्येही त्याची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT