Kharif crop Agrowon
मुख्य बातम्या

Kharif Crop : उजनी परिसरात पावसाचा खंड, खरीप पीक संकटात

Kharif Season : यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली होती. सद्यःस्थितीत बहुतांश भागातील पिकांना फुले लागत आहेत. या अवस्थेत पिकांना पावसाची अत्यंत गरज असल्याची शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी खरीप पिकांची वाढ खुंटली आहे.

Team Agrowon

Latur News : पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत असताना लातूर जिल्ह्यातील उजनी मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यातच पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, उसासह इतर खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर पिके सुकली आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तेरणा नदी कोरडी आहे. दरम्यान या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीकविम्याची अग्रिम रक्कम देण्याची मागणी विमा धारक शेतकऱ्यांनी केली आहे. उजनी (ता. औसा) मंडळात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिली होती. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जुलै महिन्याच्या शेवटी पावसाला सुरुवात झाली.

त्यानंतर मात्र पावसाचा मोठा खंड पडला आहे. सद्यःस्थितीत बहुतांश भागातील पिकांना फुले लागत आहेत. या अवस्थेत पिकांना पावसाची अत्यंत गरज असल्याची शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

या पार्श्वभूमीवर यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होती की काय? अशी शेतकऱ्यांना भीती आहे. आता पाऊस पडला तरी उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. पेरणीसाठी केलेला उसनवारी व्यवहार शेतकऱ्यांच्या अंगलट असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे शासनाने या भागातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

अग्रिम पीक विमा देण्याची मागणी

पीकविमा कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एखाद्या भागात पावसाचा २१ दिवस खंड असेल तर पीक विम्याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अॅडव्हान्स (अग्रिम) रक्कम देण्याची तरतूद आहे. पाऊस नसल्याने पिके हातची गेली आहेत.

त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना आधार देण्याची आज खरी गरज आहे. विमा कंपनीने आता कशाचीही वाट न पाहता शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करावा आणि तात्काळ अग्रिम रक्कम वाटप करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT