तूर आयातीची मूदत संपत येत असताना त्याला मूदतवाढ देण्यात आली आहे. 
मुख्य बातम्या

तूर आयातीला मुदतवाढीचे बाजारातून स्वागत!

हा सुनियोजित निर्णय असल्याचे ‘आयपीजीए’चे मत; काँग्रेसने व्यक्त केला निषेध

Mayur Girhe

पूणे : तूर आयातीची मुदत येत्या ३१ मार्चला संपणार होती. पण या आयातीला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशातील कडधान्य व्यापारी आणि उद्योजकांची संघटना असलेल्या इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आयपीजीएने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार यांनी हा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे हा एक सुनियोजित निर्णय असून व्यापार आणि उद्योग क्षेत्र तसेच ग्राहकांना फायदा होईल, असे आयपीजीएचे म्हणणे असले तरी देशात आधीच पुरवठा आधिक्य असताना आयातीला मुदतवाढ दिल्याने बाजारभाव वाढू शकणार नाहीत. आयपीजीए विविध मंत्रालयांच्या सतत संवादात असून संघटनेने आयात धोरणाची शिफारस केली आहे.

दुसरीकडे दोन दिवसांत संपेल तुर आयातीची मुदत संपेल आणि तुरीच्या दराला आधार मिळेल, असे जाणकार सांगत होते. मात्र सरकारने मंगळवारी (ता.२९) मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यामुळे पुढील वर्षभर म्यानमार, बर्मा, मालावी, मोझांबिक, आणि केनिया या देशांमधून तूर आयात होत राहणार आहे.

“केंद्राच्या या निर्णयामुळे चालू आणि पुढील हंगामावरही विपरीत परिणाम होऊन तुरीचे भाव पडतील. या शेतकरी विरोधी निर्णयाचा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या तीव्र निषेध करते. तूर आयतीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा. तसेच आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतील याची काळजी घ्यावी. केंद्रातील या निर्णयाला सर्व मराठी खासदारांनी पक्षभेद विसरून विरोध करावा असे आवाहन करतो,”
- हनुमंत पवार, प्रवक्ता, युवक काँग्रेस

तूर आणि उडदाच्या टंचाईमुळे भावावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती, असे आयपीजीएने म्हटले असून तूर आणि उडदाचे सध्याचे भाव एमएसपीच्या वर असल्याचा दावाही केला आहे. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून राज्यातील काही बाजारांमध्ये आलेल्या ठराविक मालाला किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळालाय. त्यात लातूर, उदगीर, नागपूर, औराद शहाजनी, मलकापूर, हिंगणघाट, आणि लातूर बाजारांचा समावेश असून इतर सर्व बाजारांमध्ये तुरीची भावपातळी ₹५८०० ते ₹६१०० रुपयांच्या दरम्यान असल्याचे राज्य पणन महामंडळाच्या संकेतस्थळावरून स्पष्ट होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India New Zealand Trade: भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण; कृषी क्षेत्राला संरक्षण?

Milk Processing: पोषणमूल्य जपण्यासाठी दुधावर प्रक्रिया

E Crop Survey: ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाइन पाहणी

Animal Vaccination: पशुधनाला योग्य काळातच करा लसीकरण

Sugar Factory Protest: शरद कारखान्यावर दगडफेक, भेंडवडे ग्रामस्थांचा धडक मोर्चा, वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT