Nashik DCC Bank Agrowon
मुख्य बातम्या

Nashik DCC bank : जिल्हा बॅंकेकडून वसुलीबाबत ‘अॅक्शन प्लॅन’

Nashik jilha bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा एनपीए वाढल्याने लायन्सस धोक्यात सापडल्यानंतर बॅंकेकडून वसुलीबाबत अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच बँक प्रशासनाने वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा एनपीए वाढल्याने लायन्सस धोक्यात सापडल्यानंतर बॅंकेकडून वसुलीबाबत अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच बँक प्रशासनाने वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. नियमबाह्य कर्जवाटप केलेल्या दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी), खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल) या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांविरोधात पोलिस तक्रार करूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने बँकेने आता न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. बॅंकेतर्फे दिंडोरी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेने नियमबाह्य कर्जवाटप केले. हे कर्जवाटप वसूल न झाल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली. कोट्यवधींच्या थकबाकीमुळे गाळात रुतलेल्या जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. जिल्हा बँकेच्या खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल), जऊळके शाखेत फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला होता. या तिन्ही सोसायट्यांच्या सभासदांना मंजूर झालेले पीक कर्ज संचालक मंडळातील संचालकांनी स्वतःचे व नातेवाइकांचे नावाने वाटप करून घेतले. सोसायटीच्या इतर सभासदांना कर्ज रक्कम मिळालीच नाही. बँकेचे सनदी लेखापाल यांनी २०२१-२२ च्या लेखापरीक्षणात हे नियमबाह्य कर्जवाटप झाल्याचे उघड झाले होते. या बड्या थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली.

यावर बॅंकेने स्वतंत्र लेखापरीक्षण केले. यात संबंधित तिन्ही सोसायटी संचालक दोषी आढळले. त्यानंतर या प्रकरणी वणी पोलिसांत गत वर्षापूर्वीच तक्रार अर्ज सादर झाला. मात्र, ही फसवणूक क्लिष्ट स्वरूपाची असल्याने पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आला. बॅंकेने प्राथमिक तपासानुसार सविस्तर अहवाल वणी पोलिसांनी सादर केला होता. परंतु अधीक्षक कार्यालयातून अद्याप आदेश न मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याचे त्यावेळी वणी पोलिसांनी सांगितले होते. यावर वारंवार पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने बॅंक प्रशासन, जिल्हा उपनिबंधक,सहकार निबंधक यांच्यातर्फे गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयामार्फत प्रयत्न सुरू केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

SCROLL FOR NEXT