संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अन्नविकासाबाबत ‘माफसू’त गुरुवारपासून राष्ट्रीय परिषद

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः वरुड (यवतमाळ) येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संयुक्‍त सहकार्याने कार्यात्मक अन्नाच्या विकासासाठी उदयोन्मुख कल या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. ६) व शुक्रवारी (ता. ७) ही परिषद होणार आहे.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतीकुलपती तसेच राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे परिषदेचे उद्‌घाटन करतील. कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर, राष्ट्रीय डेअरी संघटना  दिल्लीचे उपाध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक या वेळी उपस्थित राहतील.

या परिषदेत संशोधन अहवालांचे सादरीकरण केले जाणार आहे. त्याकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे २०० संशोधन लेख आयोजन समितीला प्राप्त झाल्याची माहिती माफसूच्या सूत्रांनी दिली. अभियांत्रिकी, अन्न विश्‍लेषण, अन्न सुरक्षा व नियंत्रण, कार्यात्मक अन्नातील जैव तंत्रज्ञान आदी संबंधित विषयांचे सादरीकरण आणि प्रकाशनासाठी सुमारे १०० लेख सारांश स्वीकारण्यात आले आहेत. तांत्रिक सत्रात परिषदेतील विषयाच्या अनुषंगाने कार्यात्मक अन्न विकासाच्या क्षेत्रातील सर्व बाबींचा समावेश करण्यात आला असून, त्याकरिता राष्ट्रीयस्तरावरील दहा शास्त्रज्ञांना मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT