ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत 
मुख्य बातम्या

निसर्ग चक्रीवादळबाधित वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

टीम अॅग्रोवन

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली.  महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न आहेत, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी (ता.१४) मंत्रालयात महावितरणच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात यावे. सरासरी वीजबिल टाळावे, जेणेकरून वीजबिलाच्या तक्रारी कमी होतील. त्यासाठी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करावे. धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करावे, अशा सूचना डॉ. राऊत यांनी केल्या.

‘कोरोना’च्या कारणास्तव प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीज बिलाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकत्रित वीज बिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना दोन टक्के सवलत, याशिवाय तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याच्या सुविधेबाबत माहिती देऊन ग्राहकांच्या शंकांचे समाधान आणि त्यांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करावे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल मागवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासावी. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची आवश्यकता तपासावी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून मनुष्यबळाचा सुयोग्य उपयोग करावा, असे निर्देशही डॉ. राऊत दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT