दूध दरप्रश्नी कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (ता.१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दूध दरप्रश्नी कोल्हापूर जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (ता.१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 
मुख्य बातम्या

दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने शनिवारी (ता.१) महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये आणि दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे ही भाजपची मागणी आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. सर्व घटकांना जगवणारा शेतकरी वर्ग समाधानी असला पाहिजे. त्यासाठी दुधाला योग्य दर मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.

यावेळी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने, ‘रिपाई’चे उत्तम कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले .

उदगावमध्ये ‘रयत’सह मित्रपक्षांचे आंदोलन गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपयांचे अनुदान द्यावे व दूध खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपये करावा या मागणीसाठी भाजप, रयत क्रांती, ‘रासप’, ‘आरपीआय’, ‘शिवसंग्राम’, आठवले गटाच्या पदाधिका-यांनी उदगाव (ता. शिरोळ) येथील गोकुळ दूध संघाच्या शाखेसमोर जनावरांसह युवा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले.

आंदोलनात गायी, म्हशींसह दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर उदगाव येथे येणारे सर्व दुधाचे टँकर अडवण्यात आले. यावेळी जयसिंगपूर मंडलचे रमेश यळगुडकर, मिंलीद भिडे, राजेंद्र दाईगडे, विनायक अनेगिरीकर, दिलीप माणगांवे, आकाश राणे, संतोष जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुधाला मिळत असलेला भाव व शेतक-यांची झालेली अर्थिक कोंडी यावरून सरकारवर टिका केली. त्यानंतर तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी नगरसेवक डॉ. अरविंद माने, गजानन संकपाळ, दादासो कोळी, पंकज गुरव, वसंत पवार, सुनील ताडे, हरीश सूर्यवंशी, श्रीवर्धन देशमुख, सुनिल ताडे, सुहास राजमाने, अभिद्रम मुजावर, संजय वैघ, जयपाल कांबळे, संजय शिंदे, रणधीर राजमाने, कुलदीप देशपांडे, पोपट पुजारी, महेश देवताळे, महावीर तकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. --  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT