Ashish Mishra
Ashish Mishra  
मुख्य बातम्या

Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी ; आशिष मिश्राची जामिनावर सुटका

टीम ॲग्रोवन

लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur kheri violence) प्रकरणातील मुख्य संशयित व केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राची (Ashish Mishra) मंगळवारी जामिनावर सुटका करण्यात आली.

लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्राला अटक करण्यात आली होती. चार महिन्यांपासून तुरुंगात असलेला मिश्रा प्रथमच बाहेर आला आहे. जामिनासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरच आशिषची जामिनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती लखीमपूर खेरी तुरुंगाचे अधीक्षक पी. पी. सिंग यांनी दिली आहे.

आशिष मिश्रा याने त्याच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad supreme court) लखनौ खंडपीठाने १० फेब्रुवारी रोजी त्याचा जामीन मंजूर केला होता.

मात्र त्यानंतरही त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात नव्हते. कारण मिश्रावर खुनाचा आणि गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचा आरोप असल्यामुळे न्यायालयाने त्याच्या सुटकेचा उल्लेखच या आदेशात केला नव्हता.

त्यामुळे आशिषच्या वकिलांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेत त्याचा जामीन मंजूर झाल्याचे सुधारित आदेश देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्याला तुरुंगाबाहेर जाण्याची संमती दिली असल्याचे आदेशात नमूद केले.

उच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशाची प्रत लखीमपूर खेरी जिल्हा न्यायाधीश मुकेश मिश्रा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. ३ लाख रुपयांचे व्यक्तिगत हमीपत्र आणि तेवढ्याच रकमेच्या दोन इतर हमीपत्रांवर आशिषला सोडण्यात आले असल्याची माहिती लखीमपूर खेरी जिल्हा प्रशासनाचे वकील अरविंद त्रिपाठी यांनी दिली आहे.

या प्रकरणी जामीन मंजूर झालेला आशिष मिश्रा हा दुसरा संशयित आहे. यापूर्वी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र शुक्ला याची ११ जानेवारी रोजी जामिनावर सुटका झाली आहे. गेल्यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्रा याने शेतकरी आंदोलकांवर महिंद्रा ठार गाडी चालवून तो फरार झाला होता.

चार शेतकरी आणि एका पत्रकाराला यात आपला जीव गमवावा लागला. त्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात या गाडीचा चालक आणि भाजपचे दोन कार्यकर्तेही मृत्युमुखी पडले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT