Kisan Sampada Scheme
Kisan Sampada Scheme 
मुख्य बातम्या

'किसान संपदा' योजनेत २०२६ पर्यंत वाढ; योजनेंतर्गत ४६०० कोटी वाटप

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली - केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने (Ministery Of Food Processing) पंतप्रधान किसान संपदा योजनेला (PM Kisan Sampada Scheme) (पीएमकेएसवाय) मार्च २०२६ पर्यंत मुतवाढ दिली आहे. मंत्रालयाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत चार हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवर योजनेसंदर्भात ट्विट केले आहे.

.@MOFPI_GOI की बहुआयामी 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (#PMKSY) की 2021-22 से 2025-26 तक अवधि बढ़ाई गई।इसके साथ ही योजना के परिव्यय हेतु केंद्र सरकार द्वारा आगामी अवधि के लिए 4600 करोड़ रूपयों का आंवटन किया गया। अधिक जानकारी के लिए: https://t.co/27k3KRzdyL pic.twitter.com/QKABrY8SNC

— FOOD PROCESSING MIN (@MOFPI_GOI)

पीएमकेएसवाय ही एक अशी सर्वसमावेशक योजना आहे, जी शेतीपासून (Agriculture) किरकोळ दुकानांपर्यंत (Retail Shop) कार्यक्षम पुरवठा साखळी (Supply Chain) व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान देते. अन्न प्रक्रिया (Food Processing) विभागाच्या माहितीनुसार, ही योजना अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विकासाला चालना देणारी आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासह रोजगाराच्या (Empolyment) संधी निर्माण करण्यास मदत होईल.     काय आहे किसान संपदा योजना - केंद्र सरकारने मे २०१७ मध्ये सहा हजार कोटी रुपयांच्या तरतूदीसह कृषी सागरी (Agro-Marien Processing) प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी 'संपदा' या नावाने ही योजना सुरू केली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून पंतप्रधान किसान संपदा योजना असे करण्यात आले.   पीएमकेएसवाय ही कोल्ड चेन, मूल्यवर्धन, पायाभूत सुविधा, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा, कृषी प्रक्रिया क्लस्टरसाठीच्या पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया क्षेत्राचा विकास आणि विस्तार यांचा समावेश असलेली ही एक योजना आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याच्या प्रश्नावर ‘जय श्रीराम’चे उत्तर

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र योजनेत पूर्वसंमती रद्द होण्याची भीती

Monsoon Update : मॉन्सून अंदमानात दाखल

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा कायम

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

SCROLL FOR NEXT