soybean oil
soybean oil 
मुख्य बातम्या

जागतीक सोयातेल बाजार झपाट्याने विस्तारतोय

अनिल जाधव

पुणेः जगात आरोग्यविषयक सजकता वाढल्याने लोक घराच्या अन्नाला पसंती देत आहेत. परिणामी इतर खाद्यतेलाच्या तुलनेत स्वस्त आणि सहज उपलब्ध होणाऱ्या सोयातेलाची मागणी वाढत आहे. त्यामुळे २०२१ ते २०२७ या काळात जागतीक सोयातेल बाजार वाढीचा वार्षिक चक्रवाढ दर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर सोयातेल मार्केट २०२१ मधील ६ हजार २१६ कोटी डाॅलरवरून २०२७ पर्यंत ८ हजार ४८ कोटी डाॅलरवर पोचण्याचा अंदाज आहे, असे एका संशोधन अहवालात म्हटले आहे. 

औद्योगिक वापरासह अन्न निर्मिती उद्योगामध्ये सोयातेलाचा(Soyatel) वापर वाढला आहे. तसेच बांधकाम उद्योगात भेगा भरण्यासाठी सोयाबीनपासून बनलेले उत्पादन वापरले जाते. तसेच रेजिन्स, पशुखाद्य आणि बायोडिझेलमध्येही सोयाबीनतेला मागणी आहे. यामाध्यमातून सोयातेलाचा विविध प्रकारे वापर करता येतो, हे बाजारातील अनेक उत्पादनांवरून(Production) स्पष्ट झाले. त्यामुळे २०२१ ते २०२७ या दरम्यान सोयाबीन बाजारवाढीचा वार्षिक चक्रवाढ दर ४.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. 

सध्या नागरिकांमध्ये उच्च कोलेस्टेराॅल, लठ्ठपणा आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे. मागील काही वर्षांत आहारात सोयाबीन तेलाचा समावेश होत असला तरी या आजारांचे प्रमाणा वाढत आहे. अलिकडे आरोग्यविषयक जागृती वाढल्याने लोक पॅकिंग अन्नाऐवजी घरच्या अन्नाला प्राधान्य देत आहेत. यामुळे सोयातेलाला मागणी वाढत आहे. मोहरी, सूर्यफूल, कॅनोला, ऑलिव्ह, भूईमूग, नारळ तेलाच्या तुलनेत सोयातेल स्वस्त आहे. त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशांत सोयातेलाला महत्व आहे. सोयातेल दरामुळे बाजारावर लगेच परिणाम होतो. 

२०२१ मध्ये जागतीक पातळीवर सोयाबीन तेलाचे उत्पादन ५९१.७ लाख टनांवर झाले होते. तर सोयाबीन मार्केट ६ हजार २१६ कोटी डाॅलरचे होते. ते २०२७ मध्ये ८ हजार ४८ कोटी डाॅलरवर पोचण्याचा अंदाज आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. विविध उद्योगांमध्ये पेट्रोकेमिकल्स आणि औषधजन्य पदार्थांना पर्याय म्हणून सोयाबीन तेल सहजरित्या उपलब्ध होत आहे. तेसच या पदार्थांच्या तुलनेत सोयाबीन तेल स्वस्तही आहे. त्यामुळे या उद्योगांत सोयातेलाचा वापर वाढत आहे. 

हे हि पहा : 

जागतिक खाद्यतेल बास्केटमध्ये सोयाबीन तेलाला खूप महत्व आहे. जागतीक पातळीवर चीन सोयातेल उत्पादन आणि वापरात अग्रेसर आहे. चीनमध्ये खाद्यासाठी सोयातेलाचा सर्वाधिक वापर होतो. जागतीक पातळीवर सोयातेलाचा वापर जवळपास ५९० लाख टनांवर होतो. त्यापैकी एकट्या चीनचा वाटा १८० लाख टनांच्या दरम्यान आहे. तर अमेरिका १०५ लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची वाढती लोकसंख्या आणि मागणी यामुळे सोयाबीन आणि सोयातेलाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकेतही सोयाबीन उत्पानदन आणि वापर वाढत आहे. मात्र अमेरिकेतील सोयातेल उद्योगाची वाढ २०२१ ते २०२७ या काळात कमी होण्याचा अंदाज आहे. 

दक्षिण अमेरिका खंडातील देश सोयातेलाचे मोठे निर्यातदार आहेत. २०२१ मध्ये जागतीक सोयातेल निर्यात १२४ लाख टनांवर राहिली. यात निम्मा वाटा एकट्या अर्जेंटीनाचा राहिला. अर्जेंटीनातून तब्बल ६२ लाख टन सोयातेल निर्यात झाली. त्यानंतर ब्राझीलमधून १३ लाख टन सोयातेल निर्यात झाले. २०२७ पर्यंत अर्जेंटीना, ब्राझील, युरोपियन युनियन, रशिया आणि बोलिविया या देशांचे निर्यात मार्केट वाढण्याचा अंदाज आहे. सोयातेलाचे उत्पादन वाढीचा आणि इतर तेलाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयातेल बाजार विस्तारेल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT