संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

बियाणे, खतांचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई : जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी

टीम अॅग्रोवन

नगर  ः खरीप हंगामात बियाणे, खतांचा काळाबाजार झाला तर फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी सांगितले. खते, बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी १५ भरारी पथके नियुक्त केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगर जिल्ह्यात खरिपाची पावणेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहे. याच काळात सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभाग देखील खरिपासाठी सतर्क झाला आहे.

खरिपाच्या विविध वाणांचे ६४ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तब्बल तीन लाख टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी सव्वादोन लाख टन खतांचा पुरवठा झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एक पथक स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे १४ तालुक्‍यांत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे.  

पथके देतील अहवाल जिल्ह्यात बियाणे, खतांचा काळाबाजार रोखण्यावर नियुक्त केलेली पथके लक्ष ठेवून असतील. तपासणीत काही गैरप्रकार आढळल्यास तालुकास्तरीय भरारी पथक संबंधित अहवाल जिल्हास्तरीय पथकाकडे पाठविणार आहे. अहवालात तथ्य आढळल्यास परवाना रद्द करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे देखील दाखल होणार आहे. सामान्य नागरिकही पुराव्यानिशी पथकाकडे तक्रार नोंद करु शकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT