संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळसदृश वारे

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात सोमवारी (ता. ६) पहाटे तीन वाजल्यापासून वादळसदृश‍ वारे वाहू लागले आहेत. अचानक आलेल्या या वाऱ्यांमध्ये बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वाऱ्यांमुळे चार ते पाच दिवसांपासून असलेल्या थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

जिल्ह्यात २ जानेवारीपासून थंडीला सुरुवात झाली. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत होते. परंतु, रविवारी (ता. ५) रात्रीपासून थंडीचे प्रमाण कमी झाले. सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून जिल्ह्यात जोरदार वारे वाहू लागले. या वाऱ्याला वेगही चांगला आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्टयात वाऱ्याचा वेग अधिक आहे.

जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारे वारे वाहतात. मात्र, सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या या वाऱ्यांमुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत. वाऱ्यांमुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या आहेत. समुद्रात वादळ निर्माण झाल्यामुळे गेल्या महिन्यात जिल्ह्यात वारे वाहत होते. परंतु, सध्या समुद्र शांत असून समुद्रात कोणतेही वादळ निर्माण झालेले नाही.

अशी आहे स्थिती

  • वाऱ्यामुळे काजू, आंबा बागायतदार धास्तावले
  • काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या
  • जिल्ह्याच्या पूर्व भागात वाऱ्याचे प्रमाण अधिक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

    Jharkhand Rain Update : झारखंडमध्ये अवकाळीचा कहर; वीज पडून पाच तर झाड कोसळून दोघांचा मृत्यू 

    Water Agitation : हंडा घेऊन महिला धडकल्या सिंचन विभागाच्या कार्यालयावर

    Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

    Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

    SCROLL FOR NEXT