वन्य प्राण्यांनी स्ट्राॅबेरी पिकाचे केलेले नुकसान 
मुख्य बातम्या

महाबळेश्वर परिसरात स्ट्रॅाबेरी पिकाचे रानगव्यांकडून नुकसान

टीम अॅग्रोवन

भिलार, जि. सातारा  : हवामानातील बदल आणि उत्पादित मालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अगोदरच अडचणीत असलेले स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी वन्यप्राण्यांमुळे अधिकच आर्थिक अडचणीत आले आहे. वन्यप्राण्यांकडून सुरू असलेल्‍या पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मेटगुताड (ता. महाबळेश्वर) परिसर स्ट्रॉबेरीचे माहेरघर समजले जाते. या परिसरातील शेतकरी प्रतिकूल हवामान, कमी उत्पादन, आर्थिक मंदी आणि अल्प दर यामुळे चिंताग्रस्त असताना या परिसरात वन्यप्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. मेटगुताड, लिंगमळा या परिसरातील ब्रिझी ग्रीन्स येथील तय्यब माला यांच्या २० गुंठे जमिनीवरील १० हजार स्ट्रॉबेरी रोपांचे शेतातच रानटी गव्यांनी नुकसान केले आहे. सर्व शेतात धुमाकूळ घालून गव्यांच्या कळपाने रोपांचे आणि स्ट्रॉबेरीचे अतोनात नुकसान केले आहे.

परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या वन्यप्राण्यांनी केले असून दरवर्षी रानगव्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. परंतु, वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन व गवार दर टिकून; आले-पपई दरात सुधारणा, तर भेंडी दर स्थिर

Monsoon Rain: विदर्भात पावसाचा जोर वाढणार; बुधवारपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज

Farmer Compensation Scam : अनुदानाचा मलिदा लाटणाऱ्यांवर गुन्हे

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’मुळे मृत जनावरांच्या मालकांना मदतीची अपेक्षा

Solapur Water Stock : सात मध्‍यम प्रकल्पांत ८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT