रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी येथे अमोल कलये यांच्या शेतात भात लागवड वेगात सुरु आहे
रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी येथे अमोल कलये यांच्या शेतात भात लागवड वेगात सुरु आहे 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; भात लागवड वेगात 

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे वडाचे झाड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीची कामे वेगात सुरू असून आतापर्यंत १२ हजार हेक्टरवर भातलागवड झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ४१.७७ मिमी. पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड येथे ०.५, दापोली येथे ७.७०, खेडमध्ये ३३.३०, गुहागरमध्ये २०.८०, चिपळूण येथे २५.३०, संगमेश्वरमध्ये ७६.४०, रत्नागिरीत ८३.००, राजापुरात ५३.३०, लांजा येथे ७४.८० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. 

राजापूर तालुक्यातील मौजे शिवणे बु. येथील प्रभाकर पांडुरंग भोसले (पोलिस पाटील) यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे वडाचे मोठे झाड कोसळले. सुदैवाने या मार्गावर वाहतूक सुरू नव्हती. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. ते झाड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. समुद्राला आलेल्या उधाणाने मिऱ्या पंधरामाड येथील बंधाऱ्याला भगदाड पडले असून, एक नारळाचे झाड वाहून गेले आहे. 

दरम्यान, समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. मागील आठवड्यात पाच हजार हेक्टरवर भातलागवड झाली होती. खतेही उशिराने दाखल झाली असली, तरीही लागवडीच्या तोंडावर खते मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. आतापर्यंत सुमारे १२ हजार हेक्टरवर भातलागवड पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT