संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

यवतमाळमधील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना परवाने उपलब्ध होणार मोबाईलवर

Vinod Ingole

यवतमाळ ः कृषी निविष्ठा विक्री परवाने नूतनीकरण आणि वितरणात मध्यस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या वसुलीला आळा बसावा, हे काम पारदर्शी व्हावे यासाठी पुढाकार घेत थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून परवाने देण्याची आगळीवेगळी आणि राज्याला दिशादर्शक पद्धती यवतमाळ कृषी विभागाने प्रत्यक्षात आणली आहे. मानवी हस्तक्षेपच नसल्याने या प्रक्रियेबद्दल कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. 

यवतमाळ जिल्हयाचे कृषी क्षेत्रातील मागासलेपण शेतकरी आत्महत्यांच्या माध्यमातून सातत्याने समोर आले. त्यानंतरच्या काळात फवारणीदरम्यान विषबाधांच्या सर्वाधिक घटनांची नोंद याच जिल्ह्यात झाली. यावर नियंत्रण आणण्यात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ तसेच संशोधन संस्था अपयश ठरल्या. नजीकच्या काळात मात्र राज्याला दिशादर्शक असे उपक्रम राबविण्यात येथील कृषी विभागाने घेतलेली आघाडी कौतुकास्पद ठरत आहे. 

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत तब्बल ४२ योजनांची माहिती थेट मोबाईलवर देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यापूर्वी राबविण्यात आला. त्याच्या पुढे जात  आता बियाणे, खते व कीटकनाशकांचे परवाने थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी याच कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. असा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविणारा यवतमाळ हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

खते, बियाणे व कीटकनाशकांचे परवाने देणे, त्यांचे नूतनीकरण म्हणजे खाबुगिरीचा प्रकार असा समज कृषी विभागात रूढ आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांची अडचण लक्षात घेता या माध्यमातून वसुलीचे काम होत असल्याचा आरोप सातत्याने होतो. कृषी विभागाकडून परवाने वितरणाच्यावेळी होणाऱ्या अडवणुकीमुळे याला दुजोराही मिळत होता. परंतु पारदर्शी कामाचा आदर्श जपत हे परवाने यवतमाळ कृषी विभागाने मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहेत.

अशी आहे कार्यपद्धती परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केल्यानंतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांची डिजिटल स्वाक्षरी असलेला परवाना थेट मोबाईलवर उपलब्ध करून दिला जातो. त्याकरिता ९४०४३९६११९ या मोबाईल क्रमांकावर licences असा व्हॉट्सअॅप मॅसेज करावा. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव असा शोध घेऊन आपला परवाना डाउनलोड करण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

Weather Update : सूर्य तळपल्याने होरपळ वाढली

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

SCROLL FOR NEXT