संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर, नाशिक जिल्ह्यात साखर उताऱ्यात दीड ते अडीच टक्क्यांनी घट

टीम अॅग्रोवन

नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदाच्या गाळप हंगामात साखर उतारा गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्क्यांनी कमीच आहे. नाशिक जिल्ह्यामधील कादवा सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.२९ टक्के आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.७७ टक्के आहे. सर्वात कमी ८.१३ टक्के साखर उतारा शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याचा असल्याची माहिती नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून देण्यात आली. 

यंदा नगर, नाशिक भागात उशिरा पाऊस झाला. त्याचा परिणाम उसासह साखर उताऱ्यावर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा कमी झाला असल्याचे दिसत आहे. साखर उताऱ्यानुसार उसाला दर दिला जात असल्याने यंदा ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर उतारा कमी झाल्याने त्याचा फटका पुढील वर्षातील साखरेच्या दरावर होणार आहे. 

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यांसह अनेक भागांत ऊसटंचाई असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दोन महिने लवकरच साखर कारखान्यांचे गाळप बंद होईल. नाशिक विभागात आत्तापर्यंत ४६ लाख २६ हजार ६१८ टन उसाचे गाळप झालेले असून ४६ लाख २४ हजार ३७८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.  नगर, नाशिक जिल्ह्यांत यंदा दीड ते अडीच टक्क्यांनी साखर उतारा घसरला आहे. गेल्यावर्षी सरासरी सव्वा अकरा टक्के साखर उतारा होता. यंदा आत्तापर्यंत झालेल्या ऊस गाळपानुसार मागील महिन्यात सरासरी साखर उतारा ९.३० टक्के होता, तो या महिन्यात १० टक्के झाला आहे. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत दीड ते अडीच टक्‍क्यांनी साखर उतारा कमी आहे असे नगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगितले.   

पुढील वर्षी आर्थिक फटका बसणार  नगर, नाशिक जिल्ह्यांत उशिरा झालेल्या पावसाचा साखर उताऱ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी यंदाच्या साखर उताऱ्यावर पुढील वर्षी एफआरपीचा दर निश्चित होणार आहे. यंदा घसरलेल्या उताऱ्यामुळे पुढील वर्षी आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात साखर उताऱ्यात मात्र काहीशी वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

SCROLL FOR NEXT