बार्शीटाकळी येथे सोमवारी (ता.३०) शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची सुविधा देण्यात आली.
बार्शीटाकळी येथे सोमवारी (ता.३०) शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीची सुविधा देण्यात आली. 
मुख्य बातम्या

अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी बसविण्यासाठी सकारात्मक उपाययोजनांना वेग

टीम अॅग्रोवन

अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्याचा फटका शेतकरी, भाजीपाला उत्पादकांना अधिक बसत आहे. संचारबंदी लागू झाल्यापासून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शहरी भागात दैनंदिन जीवनाश्यक वस्तुंची, भाजीपाल्याची टंचाई वाढू नये यासाठी आता यंत्रणास्तरावरून तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहे. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

अकोला जिल्ह्यात भाजीपाला उत्पादकांची माहिती गोळा करण्यात आली असून धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या संस्थांना जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यासाठी परवानेही देण्यात आले. शेतकरी गट, शेतकरी कंपन्याही भाजीपाला वितरणात महत्वाची भूमिका वठवू लागल्या आहेत. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा यंत्रणा, महसूल विभाग यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेत भाजीपाला, कलिंगड व इतर फळांचे स्टॉल लावले जात आहेत. यावरून ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवत वस्तूंचे वितरण केले जात आहेत.

अकोल्यात भाजीपाला, फळांची ठोक विक्री सात वाजेच्या आत केली जाते. त्यानंतर किरकोळ विक्रेते हा माल घेऊन त्यांना निर्देशित करून दिलेल्या जागांवर जाऊन विक्री करीत आहेत. अकोल्यात ही व्यवस्था बऱ्यापैकी यशस्वी झाल्यानंतर आता ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारचे छोटे बाजार भरविले जाऊ लागले आहेत. सोमवारी (ता.३०) जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुका मुख्यालयी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्था निर्माण करून देण्यात आली. या ठिकाणी ग्राहकांनी विशिष्ट अंतर ठेवून माल खरेदी करावा, गर्दी करू नये अशा प्रकारची खबरदारीही सुद्धा घेतल्या जात आहे.

संत्रा, केळीबाबत मार्ग निघण्याची अपेक्षा जिल्ह्यातील केळी, संत्रा बागायतदारांची या लॉकडाऊनमुळे मोठी अडचण झाली आहे. खरेदीदार नसल्याने शेतीमाल पडून आहे. तेल्हारा, अकोट तालुक्यात केळी, संत्रा ही प्रमुख फळपिके आहेत. सध्याच्या परिस्थितीत विक्री व्यवस्था विस्कळीत झाल्याने या फलोत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT