संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात नागरिकांना रेशनकार्डवर धान्याचे वाटप सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्यवाटप जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना बुधवारपासून (ता.१) सुरू करण्यात आले आहे. एप्रिलसाठी ३८६८.५० टन गहू व २५४८ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोच करण्‍यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, की मे व जून करिताचे ७७३७ टन गहू व ५०९६ टन तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना १० एप्रिलपासून पुरविण्याचे नियोजन आहे. हे धान्य केवळ अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील रेशन कार्डधारकांनाच वाटप करण्यात येणार आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्‍यासाठी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे.

एका निर्धारित वेळापत्रकात दहा कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील. सोशल डिस्टसिंगकरिता दुकानासमोर एक मीटर अंतर राखून मार्किंग करण्यात आले आहे.निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे कार्डधारकांना दुकानदार दूरध्वनीकरुन बोलवून घेतील. कार्डधारकांनी धान्य घेण्यासाठी गर्दी करु नये, याकरीता आवश्यकता भासल्यास पोलिस बंदोबस्त पुरवण्‍याबाबत पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना कळविण्यात आले आहे.

झोपडपट्टी भागात धान्य घरपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक ठरविले असून त्याप्रमाणे धान्य पाठवण्यापूर्वी कार्डधारकांना कळविण्‍यात येईल. कार्डधारकांच्या सोयीसाठी दुकानदारांना शासकीय अन्नधान्यासोबत इतर जीवनावश्यक वस्तू जसे डाळ, तेल, साखर, साबण, मीठ आदींची विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच रेशनकार्ड धारकांच्या तक्रार निवारणासाठी १०७७ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ०२०- २६१२३७४३ हा मदत केंद्र क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. साठेबाजी रोखण्यासाठी ११ पथके जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्‍याकरीता परिमंडळनिहाय ११ पथकांव्दारे दररोज तपासणी करण्‍यात येत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, दूध व औषधांची सद्यःस्थितीत एकूण २७ हजार २१० दुकाने सुरळीतपणे सुरु आहेत. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याकरिता बाजारसमिती, होलसेल व्यापारी, किराणा भुसार असोसिएशन, व्यापारी महासंघ यांच्‍याशी समन्वय ठेवण्‍यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT