संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत मुदत

टीम अॅग्रोवन

पुणे  ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, विविध गटांतील उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत बुधवारपर्यंत (ता.२९) असून, अर्जांची छाननी गुरुवारी (ता.३०); तर अंतिम उमेदवारी यादी शुक्रवारी (ता.३१) प्रसिद्ध होणार आहे. मतदान २९ फेब्रुवारीला होणार असून, मतमोजणी २ मार्चला होईल. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार लेखापरीक्षणात उघड झाल्यानंतर तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी २६ जून २०१४ रोजी संचालक मंडळ बरखास्त करून, संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर या बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. ६ वर्षांनतर बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून, मतदानातून १८ संचालकांची निवड होणार आहे. बाजार समितीवर शासननियुक्त ५ आणि मुंबई, नवी मुंबई महापालिकांचे दोन प्रतिनिधी आणि पणन संचालक असे एकूण २६ जणांचे संचालक मंडळ असणार आहे. 

असे आहेत मतदारसंघ 

  • फळे विभाग- १, भाजीपाला विभाग -१ , मसाला विभाग - १, कांदा, बटाटा विभाग - १, अन्नधान्य विभाग- १, हमाल मापाडी -१.  एकूण - ६.
  • महसूल विभागनिहाय प्रत्येकी २ याप्रमाणे सहा विभागांनुसार- १२ संचालक 
  • शासननियुक्त प्रतिनिधी - ५ (यात २ महिला, १ एनटी, १ एसटी, १ ओबीसी यांचा समावेश)
  • महापालिका प्रतिनिधी - २
  • पणन संचालक -१ 
  • एकूण - २६.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT