उजनी धरण सोमवारी (ता.३१) शंभर टक्के भरले.
उजनी धरण सोमवारी (ता.३१) शंभर टक्के भरले.  
मुख्य बातम्या

उजनी धरणात १०० टक्के साठा

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्याकडील धरणांतून पाण्याचा विसर्ग अखंड सुरु राहिल्याने उजनी धरणाने सोमवारी (ता.३१) दुपारी बारा वाजेच्या सुमारास १०० टक्क्यांची पातळी गाठली. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. पण पुण्याकडील पावसावर धरणाने शंभर टक्केची पातळी गाठली. त्यामुळे धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. तसेच ऑगस्टमध्येही तसा जेमतेम पाऊस झाला आहे. सातत्याने थांबून-थांबून तो बरसतो आहे. परंतु विहिरी, नाले भरुन वाहतील, असा दमदार पाऊस जिल्ह्यात अद्यापही झालेला नाही. धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यातील खडकवासला, मुळशी,  पवना यासह अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी, या धरणांतील अतिरिक्त पाणी दौंडकडून उजनी धरणामध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाटयाने वाढत गेली.

या आधी १७ ऑगस्टला ५० टक्‍क्‍यांपर्यंत असणारी पाणी पातळी पंधरवड्यातच जवळपास दुप्पटीने ५० टक्‍क्‍यांनी वाढली आणि धरण शंभर टक्के भरले. केवळ पाण्याच्या अखंड विसर्गामुळे पातळीत वाढ होत गेली. सोमवारी दौंडकडून धरणात २३ हजार ९९६ क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. सोमवारी दुपारी उजनी कालवा सुरु करण्यात आला आहे. सध्या ४०० क्‍युसेकचा विसर्ग असून, तो आणखी वाढवला जाणार आहे. तसेच भीमा-सीना बोगद्यात ९०० क्‍युसेक आणि सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २६२ क्‍युसेक इतके पाणी सोडले जात आहे.    उजनी धरणातील सोमवारची पाणीपातळी 

  • एकूण पाणी पातळी : ४९६.८३५ मीटर 
  • एकूण पाणी साठा : ११७.२९ टीएमसी 
  • उपयुक्त पाणीसाठा : ५३.६३ टीएमसी 
  • टक्केवारी : १००.११ टक्के 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT