एसआरटी पध्दतीने केलेली भात लागवड
एसआरटी पध्दतीने केलेली भात लागवड 
मुख्य बातम्या

भाताचे एसआरटी तंत्रज्ञान पोचणार परदेशात

टीम अॅग्रोवन

पुणे  ः सगुणा राइस तंत्रज्ञानामुळे (एसआरटी) भात उत्पादनात भरीव वाढ मिळाली, त्याचबरोबरीने शून्य मशागत तंत्र आणि जमिनीच्या सुपीकतेलाही चालना मिळाली. भात पिकाच्या बरोबरीने इतर हंगामी पिकांचा लागवड खर्च कमी करणाऱ्या आणि जमिनीची सुपीकता वाढवत नेणाऱ्या या तंत्रज्ञानाचा विकास मालेगाव (जि. रायगड) येथील कृषिरत्न पुरस्कारविजेते शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी केला आहे. गेल्या चार वर्षांत ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याबरोबरीने परराज्यांत देखील झाला. आता या तंत्रज्ञानाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. 

मेक्सिको देशातील सिमिट (आंतरराष्ट्रीय मका आणि गहू विकसन केंद्र) या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेमध्ये रविवार (ता. १२) ते शनिवार (ता. १८) दरम्यान जागतिक शेतकरी गटांमार्फत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी भारतातून चंद्रशेखर भडसावळे यांना भात शेतीमधील एसआरटी तंत्रज्ञानाबाबत सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातील निमंत्रित प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञ शेतीमधील नवीन संशोधन मांडणार आहेत. या परिषदेसोबतच अमेरिकेतील टस्किगी विद्यापीठाने देखील चंद्रशेखर भडसावळे यांना एसआरटी तंत्रज्ञान तेथील शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. टस्किगी विद्यापीठ हे अमेरिकेतील प्रगत विद्यापीठ म्हणून ओळखले जातेच, त्याचबरोबरीने प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची कर्मभूमी म्हणून देखील विद्यापीठाची वेगळी ओळख आहे. 

याबाबत भडसावळे म्हणाले, की जगभगरातील निवडक २५ ते ३० प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञ या परिषदेमध्ये आपले विविध पिकांतील नवीन संशोधन मांडणार आहेत. यामध्ये मी भात शेतीमधील सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) आणि शेतकऱ्यांमध्ये झालेला प्रसार याबाबत माहिती देत आहे. परिषदेमध्ये विविध देशांतील सामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या तंत्रज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे. या चर्चेत एसआरटी पद्धतीमध्ये भात बियाणे पेरणी यंत्र आणि कापणी यंत्र निर्मितीबाबत संभाव्य संशोधनाची दिशा स्पष्ट होईल. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे.

परिषदेमध्ये परदेशातील शेतकरी तसेच तज्ज्ञ कृषी तंत्रज्ञान प्रसार, यांत्रिकीकरणाबाबत उपयुक्त संशोधन मांडणार आहेत. भविष्यातील शेती तंत्र, बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाची आंतराष्ट्रीय पातळीवर देवाण घेवाणही होणार आहे. जगभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

एसआरटी तंत्रज्ञानाचे फायदे  

  • गादी वाफा आणि शून्य मशागत तंत्रज्ञाचा पुरेपूर वापर.
  • पीक लागवड, व्यवस्थापन खर्चात बचत, उत्पादनात वाढ. 
  • शेतामध्येच जल, मृद्संधारण, सेंद्रिय कर्बवाढीसाठी फायदेशीर. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Insurance : पीकविम्याचे बदल शेतकऱ्यांच्या किती फायद्याचे?

    Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

    Mahabeej Seed : महाबीजने बियाण्यात साधली विक्रमी वाढ

    Unseasonal Rain : नगरसह नेवासा, पारनेर, शेवगावमध्ये वादळी पाऊस

    Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

    SCROLL FOR NEXT