विमाप्रश्नी निवेदन देताना संत्रा उत्पादक शेतकरी
विमाप्रश्नी निवेदन देताना संत्रा उत्पादक शेतकरी 
मुख्य बातम्या

संत्रा पिकाला विमा न मिळाल्याने अकोलखेडमधील शेतकरी संतप्त

टीम अॅग्रोवन

अकोला  ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील दोन मंडलांतील शेतकऱ्यांना संत्रा पीकविम्याचा लाभ मिळाला. मात्र शेजारच्याच अकोलखेड मंडळातील संत्रा पिकाला विमा न मिळाल्याने अन्याय झाला असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, काँग्रेसचे शेतकरी नेते राजू भालतिलक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अकोट तहसीलमध्ये नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले, की अकोट तालुक्यातील उमरा आणि पणज या महसूल मंडळात संत्रा पिकाला मृग बहराचा हेक्टरी ३८,५०० रुपये विमा मंजूर झाला. मात्र या दोन्ही मंडलांच्या मध्यभागी असलेले अकोलखेड मंडळात संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड असून, येथील शेतकऱ्यांनी या पिकाचा विमा काढूनही पीकविमा मिळाला नाही. गेल्या वर्षी कोरडा, तर या वर्षी ओल्या दुष्काळामुळे येथील शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने जाहीर केलेली दुष्काळी मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. आता तर विमा कंपनीने दुजाभाव करून अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

अकोट तालुक्यात अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून फळबागायतदारांकरिता शासनाने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आणली; मात्र त्याचा फायदा फलोत्पादक शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झाला असा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. पणज, उमरा आणि अकोलखेड ही महसूल मंडले एकमेकांना लागून असल्याने हवामानाचा बदल एकाच मंडलात झाला काय, असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.

उमरा, पणज मंडलाला हेक्टरी ३८,५०० रुपये जमा झाले. मात्र अकोलखेड मंडळाला पीकविम्यातून वगळण्यात आल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांचे पंचनामे होऊनसुद्धा मदत मिळाली नव्हती. या वर्षी अवकाळी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबाग व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT