किकवारी खुर्द येथील शेतकरी केदा बापू काकुळते यांच्या शेतात सुरु असलेली कांदा लागवड.
किकवारी खुर्द येथील शेतकरी केदा बापू काकुळते यांच्या शेतात सुरु असलेली कांदा लागवड. 
मुख्य बातम्या

नाशिक विभागात उन्हाळ कांद्याची पावणे दोन लाख हेक्टरवर लागवड

मुकुंद पिंगळे

नाशिक : चालूवर्षी उन्हाळ कांद्याला अखेरच्या टप्प्यात चांगला दर मिळाला. तसेच, चांगला पाऊस झाल्याने असल्याने नाशिक विभागात उन्हाळ कांदा लागवड क्षेत्र प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नाशिक विभागात उन्हाळ कांदा लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ३६ हजार ३२६ हेक्‍टर आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विभागात एकूण १ लाख ७७ हजार १३३ हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. 

सुरुवातीला अतिवृष्टीमुळे कांदा रोपे खराब झाल्याने चालू वर्षी लागवडी लांबणीवर गेल्या. रोपांच्या उपलब्धतेनुसार लागवडी टप्प्याटप्प्याने झाल्या. ज्या भागात कांदा लागवडी होत नव्हत्या, त्याभागातही लागवड क्षेत्र वाढले आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र तब्बल सातपटीने वाढले आहे. विभागात सर्वात कमी लागवड नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 

मागील वर्षी ऑगस्टनंतर कांद्याची उपलब्धता मागणीच्या तुलनेत होत नसल्याने दर वधारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अतिवृष्टीमुळे खरीप कांदा लागवडी होऊनही मालाचा पुरेसा पुरवठा न झाल्याने उच्चांकी दर मिळाले. चालू वर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

नाशिक जिल्ह्यात कसमादे भाग हा कांदा लागवडीत आघाडीवर असतो. त्याखालोखाल चांदवड, निफाड, नांदगाव, मालेगाव, देवळा, सटाणा, सिन्नर या दुष्काळग्रस्त तालुक्‍यांतही कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. दरात अस्थिरता असूनही येथील शेतकऱ्यांनी कांद्याला पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

दर वाढल्याने कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. अतिवृष्टीमुळे सुरुवातीला रोपे खराब झाली. त्यामुळे सुरुवातीला लागवडी मर्यादित झाल्या. मात्र, नंतरच्या टप्प्यात रोपे आणि पाणी उपलब्ध झाल्याने लागवड क्षेत्र वाढत गेले, असे बार्डे (ता.कळवण) येथील शेतकरी पंडित वाघ यांनी सांगितले.

विभागातील जिल्हानिहाय कांदा लागवड स्थिती : (हेक्‍टर) 
जिल्हा सरासरी क्षेत्र  झालेली लागवड 
नाशिक २०,५८४ १,४९,८६६
धुळे  ६,१४२ १४,७८९
जळगाव ६,२७५ ९,८९१ 
नंदुरबार  ३,३२५  २,५८७ 
एकूण ३६,३२६  १,७७,१३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT