भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात दूध दरप्रश्नी वलगाव टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.  
मुख्य बातम्या

दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

टीम अॅग्रोवन

नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने शनिवारी (ता.१) करण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमरावती येथे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. हा अपवाद वगळता विदर्भातील अकरा जिल्ह्यांत आंदोलन शांततेत पार पडले.

भाजप किसान मोर्चा, रयत क्रांती संघटनेसह  महायुतीतील घटक पक्षांच्यावतीने दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, दुधाला ३० रुपये दर द्यावा, तसेच दूध भुकटीला ५० रुपये किलोप्रमाणे निर्यातीसाठी अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती.

पूर्व विदर्भातील दुर्गम गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील निःशुल्क दूध वितरण करीत आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथे माजी राज्यमंत्री मदन येरावार,  प्रा. अशोक उईके यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. नागपूर येथे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी शहरातील काही दूध संकलन केंद्रावर जात तेथील दूध गरजूंना निःशुल्क वाटप केले. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वर्धा येथे खासदार रामदास तडस यांनी दूध वाहतूक करणारी वाहने थांबवत या वाहनांमधील दुधाचे गरजूंना निःशुल्क वितरण केले. 

अमरावती जिल्ह्यात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मुंबई - नागपूर महामार्गावरील टोल नाक्यावर पहाटेच्यावेळी दूध घेऊन जाणारी वाहने रोखण्यात आली. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप डॉ. बोंडे यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया

शांततामय मार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात तीव्र आंदोलन केले जाईल. सामान्यांना या आंदोलनाची झळ पोचू नये, याकरिता मंत्र्यांच्या घरचा दूध पुरवठा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात रोखण्यात येईल असे प्रस्तावित आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाबाबत सर्व घटकांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. - डॉ. अनिल बोंडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा.   असे झाले आंदोलन

  • अनेक ठिकाणी गरजूंना निःशुल्क दूध वाटप.
  • अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना अटक.
  • सेलू येथे रास्ता रोको आंदोलन. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

    Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

    Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

    Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

    Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

    SCROLL FOR NEXT