संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अटींवरच शेतकऱ्यांना वर्ध्यात कापूस विक्रीची परवानगी

टीम अॅग्रोवन

वर्धा  ः वर्धा जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या शेतकऱ्यांना संचारबंदीमुळे कापूस विक्रीत अडचण येत आहे. ही बाब लक्षात घेत इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आठवड्यातील एक दिवस वर्धा जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी काढले आहेत. 

वर्धा जिल्ह्याच्या हद्दीला लागून असलेल्या शेजारील जिल्ह्यातील काही गावांची कापूस विक्रीकरिता वर्धा ही पारंपारिक बाजारपेठ आहे. परंतु ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी आणण्यास अडचण होत होती. या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वर्ध्यात प्रवेश देण्याची गरज होती. त्यानुसार अटी व शर्तींच्या अधीन राहत या शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांतील कापसाचे वाहन जिनिंगमध्ये आल्यानंतर वाहनासोबत असलेली व्यक्‍ती स्थानिकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. जिनींगच्या आवारात वाहन आल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे, खरेदी केंद्रावर नमूद व्यवस्था असल्याची खातरजमा केल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातील कापूस विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक परवानगी देतील. स्थानिक मजुरांच्या साहाय्याने कापूस उतरविण्याची व्यवस्था करावी. 

कोणत्याही परिस्थितीत बाहेरील जिल्ह्यातून आलेला मजूर हे काम करणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या दिवशी बाहेर जिल्ह्यातील वाहनाने कापूस संबंधित सुत गिरणीमध्ये येणार असेल त्या दिवशी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व निरीक्षण करण्यासाठी उपस्थित राहतील. बाहेर जिल्ह्यातील कापूस खरेदीकरिता निश्चि‍त केलेल्या दिवशी अशा जिनींगच्या परिसरात वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. कापूस वाहतुकीकरिता येणारे वाहन कोणत्याही परिस्थितीत चार तासांच्या आत वर्धा जिल्ह्यातून बाहेर जाईल याची दक्षता घ्यावी.  जिनींग व्यवस्थापनाने प्रवेशव्दाराजवळ हॅण्डवॉश सेंटरची उभारणी करावी. अशा अटींचा भंग केल्यास संबंधितांविरोधात कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT