भात पिकावर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे
भात पिकावर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भातपिकावर प्रामुख्याने करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक फुलोऱ्यावर असताना कीड -रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात या खरीप हंगामात सुमारे ५५ हजार हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. यावर्षी रोपांची वाढ जोमदार आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांत भात शेतीची स्थिती समाधानकारक आहे.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील बहुतांश भागात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्याच्या काही भागांत प्रतिकूल हवामानामुळे भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सध्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवडयात पेरणी आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात भात रोपांची लागवड झालेले पीक आता फुलोऱ्याला आले आहेत. फुलोऱ्यावर पिक असताना रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील ८० टक्के भात पोटरीमध्ये आहे. या काळात पावसाची गरज आहे. परंतु, गेल्या चार ते पाच दिवसांत पाऊस न पडल्यामुळे भातशेती देखील संकटात आहे.

प्रतिक्रिया भात पिकावर करपा, शेंडे करपा रोग नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. सध्या काही अपवाद वगळता बहुतांशी भात पीक पोटरीत असून पाण्याची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी भातशेतीला पाणी द्यावे. - विवेकानंद नाईक, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, सिंधुदुर्ग.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT