संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

रत्नागिरी जिल्हा बॅंकेकडून सव्वा पाच कोटींवर पीककर्ज वितरित

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शुक्रवारपर्यंत (ता.५) ५ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सव्वालाख शेतकरी सभासद असून ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये भात लागवडीचे क्षेत्र सुमारे ७० हजार हेक्टर आहे. सध्या गावोगावी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून दाखल झाले आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ची धास्ती वाढली आहे. रुग्ण संख्या अधिक असून एसटीसह खासगी वाहतूक अजूनही बंद आहेत. त्याचा परिणाम पीककर्ज वाटपावर होत आहे.

काहींनी भात पेरणीला सुरुवातही केली आहे. मात्र यंदा खरीप पीक कर्ज घेण्यावर ‘कोरोना’चे सावट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शेतकरी कमी प्रमाणात पीक कर्ज उचलतात. त्यानुसार बँकांनी कर्ज वाटपाची तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अग्रणी बँक शाखानिहाय कर्ज देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक शेती कर्जाची मागणी जिल्हा बँकेकडून होते. जिल्ह्यातील बॅंकांना यंदा ५५ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आत्तापर्यंत या बँकेकडून ५ कोटी ३७ लाख ७० हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. रत्नागिरी,  गुहागर आणि मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अद्यापही पीक कर्ज घेतलेले नाही.

तालुकानिहाय पीककर्ज वाटप स्थिती (रुपये)
तालुका  कर्जवाटप
दापोली    ४ लाख १० हजार
खेड ६ लाख ३८ हजार 
चिपळूण १३ लाख ३ हजार 
संगमेश्वर  १ कोटी ४ लाख ९४ हजार
लांजा   १८ लाख २० हजार
राजापूर १२ लाख ९२ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT