दूधविक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची
दूधविक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची 
मुख्य बातम्या

गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढ

टीम अॅग्रोवन

पुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूध टंचाई जाणवू लागल्याने खासगी आणि सहकारी दूध संघांकडून गायीच्या दूधविक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची; तर खरेदी दरात १ रुपयांची वाढ सोमवारपासून (ता.१६) करण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के आणि सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

पुणे येथे शनिवारी (ता.१४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कल्याणकारी संघाची शनिवारी कात्रज दूध संघात बैठक झाली. या वेळी ६० संघांचे १५० प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कुतवळ म्हणाले, ‘‘पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडले तर मोठ्या प्रमाणावर पशुधन आजारी पडल्याने ३० टक्के दूध संकलन कमी झाले आहे’’. तसेच परराज्यातून खरेदी वाढत असल्याने दुधाची टंचाई जाणवू लागली आहे. तसेच प्रति लिटर ५ रुपये दूध खरेदी अनुदानासाठी पुढील आठवड्यात कल्याणकारी संघाचे शिष्टमंडळ दुग्धविकास मंत्र्यांना भेटणार आहे, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT