घाऊक सौद्यांवेळी किरकोळ खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने हे सौदे तपोवन मैदानाऐवजी बाजारसमितीच्या आवरात घेण्याचे ठरवण्यात आले.
घाऊक सौद्यांवेळी किरकोळ खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने हे सौदे तपोवन मैदानाऐवजी बाजारसमितीच्या आवरात घेण्याचे ठरवण्यात आले. 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात आजपासून बाजारसमितीतच भाजीपाल्याचे सौदे

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव तपोवन मैदानावर होणारे भाजीपाल्याचे सौदे सोमवारपासून (ता.३०) पुन्हा बाजारसमितीच्या आवारातच होणार आहेत. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी शनिवारपासून (ता.२८) तपोवन मैदानावर भाजीपाल्याचे सौदे काढण्याचे ठरवले होते.  

बाजारसमितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथे फक्त घाऊक सौदे होणार होते. किरकोळ विक्री शहरातील विविध ठिकाणी होणार होती. पण शनिवारी स्थानिक नागरिकांना याची फारशी माहिती नसल्याने किरकोळ खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. यामुळे सौदयात अडथळे आलेच पण जादा गर्दी झाल्यामुळे सौदे प्रशस्त ठिकाणी हलवण्याचा निर्णयच अंगलट आला. रविवारीही तशीच स्थिती राहिली जर पुन्हा मैदानात सौदे सुरू झाल्यास किरकोळ खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सौदे सोमवारपासून बाजारसमितीच्या आवारातच होतील, अशी माहिती बाजारसमितीचे सचिव मोहन सालपे यांनी दिली. यासाठी बाजारसमितीतच वेगवेगळ्या ठिकाणी सोय आम्ही केल्याचे श्री. सालपे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT