ब्रम्हपुरी (ता.परभणी) शिवारातील हनुमान आळसे यांच्या शेतातील मका पीकांवर लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला आहे.
ब्रम्हपुरी (ता.परभणी) शिवारातील हनुमान आळसे यांच्या शेतातील मका पीकांवर लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला आहे.  
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मका, ज्वारीवर लष्करी अळी

टीम अॅग्रोवन

परभणी  : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील मका, ज्वारी पीकांवर काही ठिकाणी लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून आला आहे.मक्यावरील लष्करी अळी आर्थिक नुकसान पातळी चटकन ओलांडते त्यामुळे या अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती तसेच शिफारशीत किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्लानुसार करण्याची गरज आहे. 

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र अन्य जिल्ह्यच्या तुलनेत कमी आहे.शेतकरी चारा पीक म्हणून छोट्या क्षेत्रावर मक्याची लागवड करतात.खरिप ज्वारीचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे. चारा पीक (कडवळ) म्हणून देखील रब्बी ज्वारीची लागवड शेतकरी करतात. या तीन जिल्ह्यांतील खरिपाच्या पेरण्या अद्याप अपूर्ण आहेत. मका, ज्वारी आदी पीके नुकतेच उगवली आहेत. काही भागात ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. 

ब्रम्हपुरी (ता.परभणी) येथील वाढी अवस्थेतील मका, कडवळ पिकांवर ८ ते १० दिवसांपूर्वी लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पथकाला हिंगोली जिल्ह्यातील चिखली, पांगरा सती (ता.वसमत) तसेच अन्य भागात मका, ज्वारीवर लष्करी अळीचा प्राद्रुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे,’’ असे कृषीविद्यावेत्ता डॉ. यु. एन.आळसे यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात कृषी विभाग तसेच कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या पथकला कामारवाडी आदी भागातील मक्यावर लष्करी अळी आढळून आली आहे, असे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील किटकशास्ज्ञ डॉ. शिवाजी तेलंग यांनी सांगितले. 

मक्यावरील लष्कारी अळी चटकन आर्थिक नुकसान पातळी ओलांडते. त्यामुळे या अळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकांची शिफारशीत प्रमाणात फवारणी करावी. पिकांमध्ये कामगंध सापळे लावावेत, असे  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील  किटकशास्त्रज्ञ  डॉ. बी. व्हि. भेद यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT