Flood Agrowon
मुख्य बातम्या

Crops Under Water : अतिवृष्टीमुळे ५० हजार एकरावरील पिके पाण्याखाली, हरियाणातील शेतकरी अडचणीत

 Water logging : गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सूनचा कहर सातत्याने सुरू आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतात उगवलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. जास्त पाण्यामुळे खरीपाचे पिके पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Paddy Farming : यंदा उत्तर भारतात पावसाने दमदार हजेरी लावली. डोंगराळ भागात तसेच मैदानी भागात मुसळधार पावसामुळे पाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  पूराच्या पाण्यात  खरीपाचे पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाएेवजी काळजीच्या रेषा दिसत आहेत.
 
 हरियाणा राज्यातील करनाल जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात सुमारे ५० हजार एकर क्षेत्रावरील खरीप हंगामातील भातासह इतर पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मागील आठवड्यापासून हरियाणामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उंद्री आणि कुंजपुरामधील अनेक गावे पाण्याखाली गेले. तर यमुना नदीच्या पाणी पातळीत कमाली वाढ झाली. पूराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरल्याने अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. पूराच्या पाण्यात शेतातील भात बुडाल्याने पीके वाया गेली आहे. त्यामुळे भाताच्या पुनर्लागवडसाठी भात रोपांची मागणी वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या दुबार पेरणीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी प्रशासन पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे. प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे की, सध्याच्या पूरसदृश्य भागात बचाव कार्य सुरू असून बाधितांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिबीर स्थळावर बाधितांना अन्नाचे पाकिट आणि पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  

हरियाणाच्या काही भागात पावसाचा इशारा 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, हरियाणाच्या काही भागांसह आज तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशामध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT