Chouhan waives off Rs 6,400 crore Electricity Bills 
मुख्य बातम्या

मध्य प्रदेशात वीजबिल माफी ; महाराष्ट्रात कधी ?

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government)वीजबिले माफ करेल की नाही ते ठाऊक नाहीय मात्र मध्य प्रदेश सरकारनं (Madya Pardesh Government) कोरोना काळातील वीजबिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय.मध्य प्रदेश सरकारनंनुकतेच ६४०० कोटी रुपयांची वीजबिले माफ केल्याची घोषणा केलीय.

टीम अॅग्रोवन

कोरोना आणि त्यामुळं लावलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे झालेले हाल पहाता या काळातील वीजबिले माफ करण्याचा आग्रह महाराष्ट्रातही धरण्यात येत आहे. सध्या विधीमंडळ अधिवेशनात या विषयावर घमासान चर्चा सुरुय. महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) वीजबिले (Electricity Bills) माफ करेल की नाही ते ठाऊक नाहीय मात्र मध्य प्रदेश सरकारनं (Madya Pardesh Government) कोरोना काळातील वीजबिलं माफ करण्याचा निर्णय घेतलाय.  

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी नुकतेच ६४०० कोटी रुपयांची वीजबिले (Electricity Bills) माफ केल्याची घोषणा केलीय. राज्यातील ८८ लाख वीज ग्राहकांना या वीजबिल माफीचा थेट लाभ मिळणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी सभागृहात ही घोषणा केलीय.  

मध्य प्रदेश सरकारनं (Madya Pardesh Government) कोरोना काळात वीजबिलांची वसुली थांबवली होती. तिथे ग्राहकांना समाधान योजनेचा (Samadhan Yojana) लाभ देण्यात आला. या योजने अंतर्गत ४८ लाख ग्राहकांनी तडजोड मूल्य म्हणून किमान बिले भरली. मात्र कोरोना महामारीच्या काळातील सर्वसामान्यांच्या अडचणींचा विचार करून ८८ लाख नागरिकांचे वीजबिल (Electricity Bills) माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं चौहान यांनी सभागृहात सांगितलं. 

ज्या ४८ लाख नागरिकांनी तडजोड योजने अंतर्गत १९८ कोटी रुपयांची वीजबिले भरली आहे, त्यांनाही या वीजबिल (Electricity Bills) माफीचा लाभ होणार आहे. त्यांनी भरलेली रक्कम त्यांच्या पुढच्या वीजबिलांत वळती करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलंय. 

व्हिडीओ पहा    शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचे हप्ते राज्य सरकारकडून भरण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे चौहान यांनी नमूद केलंय. मध्य प्रदेश सरकारने आमदारांचा स्थानिक क्षेत्र विकास निधी २ कोटींवरून ३ कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला असून यातील ५० लाख रुपयांचा खर्च वैकल्पिक  निधी म्हणून करण्यात येणार आहे. 

जर आता मध्य प्रदेशात (Madya Pardesh) कोरोना काळातील वीजबिले माफ केली जातात, मग महाराष्ट्रात (Maharashtra) ते का शक्य होत नाही ? असा सवाल उपस्थित केला जातोय. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT