Boom in Indian Tractor market  
मुख्य बातम्या

Indian Tractor Market : भारतीय ट्रॅक्टर बाजारात तेजी

जगातील एक तृतीयांश ट्रॅक्टरचे (Tractor) उत्पादन भारतात होते. २०२१ ते २०१८ या दरम्यान भारतातील कृषी ट्रॅक्टरची बाजारपेठ ५.६८ टक्कयांनी वाढली असल्याचे या संशीधनपर पाहणीत नमूद करण्यात आले आहे. विशेषतः उत्तर भागातून ट्रॅक्टरला मोठी मागणी असल्याचं समोर आलंय.

टीम ॲग्रोवन

शेतीकामासाठी आता ट्रॅक्टरचा (Tractor) वापर अनिवार्य झाला आहे. आधुनिक शेती म्हटलं की ट्रॅक्टर आलाच. भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा (Tractor) वापर केला जातो. एका संशोधनानुसार २०२८ सालापर्यंत भारतात ९ लाख १० हजार ट्रॅक्टर विकल्या जातील, असा अंदाज आहे.

जगातील एक तृतीयांश ट्रॅक्टरचे (Tractor) उत्पादन भारतात होते. २०२१ ते २०१८ या दरम्यान भारतातील कृषी ट्रॅक्टरची बाजारपेठ ५.६८ टक्कयांनी वाढली असल्याचे या संशीधनपर पाहणीत नमूद करण्यात आले आहे. विशेषतः उत्तर भागातून ट्रॅक्टरला मोठी मागणी असल्याचं समोर आलंय.

ट्रॅक्टर बाजारानुसार भारतीय बाजारपेठेचे पूर्व, पश्चिम उत्तर आणि दक्षिण असे चार विभाग आहेत.भारतातील एकूण ट्रॅक्टर बाजारात टु व्हील ड्राईव्ह (२WD) सेगमेंटला मोठी मागणी असून या सेंगमेंटचा एकूण भारतीय ट्रॅक्टर बाजारातील हिस्सा ९० टक्के आहे. कोविड महामारी आणि टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल ७. ९ टक्क्यांनी मंदावलीय. अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्ज उपलब्ध . संघटित करून देण्याचे धोरण अंगिकारले आहे.

याशिवाय कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचाही निर्णय राबवण्यात येत आहे. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यात येते आहे. अद्ययावत कृषी उपकरणांच्या माध्यमातून किमान उत्पादन खर्चात कमाल उत्पादन घेण्याच्या सरकारी धोरणामुळे भारतातील ट्रॅक्टर विक्री क्षेत्राला उधाण आले आहे. कृषी उपकरणे म्हटले की ट्रॅक्टर आठवते. कृषी यांत्रिकीकरण ( Agri-Mechanization) म्हटलं तरी ट्रॅक्टर (Tractor) येतच.

कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकरी मोठया प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी करताहेत. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT), डाटा ॲनलिसिस आणि अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग क्षेत्रही झपाट्याने बदलत आहे. कृषी क्षेत्राच्या उद्याच्या गरजांची पूर्तता करणारे तंत्रज्ञान अंतर्भूत करण्याचा प्रयत्न ट्रॅक्टर उत्पादकांकडून केला जात आहे.

भारतीय ट्रॅक्टर बाजारात महिंद्रा इंटरनॅशनल, टाफे, एस्कॉर्टस, सोनालिका इंटरनॅशनल, जॉन डिअर अँड कंपनी,सीएचएन इंटरनॅशनल अशा काही प्रमुख ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या आहेत. महिंद्रा इंटरनॅशनल आणि टाफे या दोन ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी एकत्रितरीत्या भारतातील ६० टक्के ट्रॅक्टर बाजारपेठ काबीज केलीय. उर्वरित हिश्श्यात एस्कॉर्टस,डिअर, सीएनएच,कुबोटा, एसडीएफ, फोर्स मोटर्स, प्रीत ग्रुप,कॅप्टन ट्रॅक्टर्स, व्हीएसटी ट्रेलर्स आदी ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.

२० हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर्स मिनी ट्रॅक्टर्स म्हणून ओळखले जातात. छोट्या शेतकऱ्यांसाठी हे मिनी ट्रॅक्टर्स आयडीयल मानले जातात. कापूस लागवड, फळबागा आणि आंतरमशागतीच्या कामांसाठी हे ट्रॅक्टर्स वापरण्यात येतात.भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठेत टू व्हील ड्राईव्ह (2WD) आणि ४ व्हील ड्राईव्ह (4WD) असे दोन प्रकार आहेत. मात्र भारतीय ट्रॅक्टर बाजारात मध्यम क्षमतेच्या टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर्सचे प्रमाण लक्षणीय राहिलेले आहे. ट्रॅक्टरचे कैक प्रकार देशात उपलब्ध आहे पण शेतकऱ्यांची पहिली पसंती टू व्हील ड्राईव्हला (2WD)आहे.

देशात २० हॉर्स पॉवर क्षमतेपासून ते १००० हॉर्स पॉवर क्षमतेची ट्रॅक्टर्स आहेत. डिजिटल ऍग्रीकल्चर आणि स्मार्ट ऍग्रीकल्चर संकल्पनांचा विचार करून कंपन्या प्रकारची ट्रॅक्टर्स उत्पादित करत आहेत. काही कंपन्यांनी ड्रॉयव्हरलेस ट्रॅक्टर आणण्याची तयारीही केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT