uddhavthackeraycmo
uddhavthackeraycmo 
मुख्य बातम्या

आता राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच !

टीम अॅग्रोवन

एकीकडे राज्यभरात मराठी भाषेच्या जोपासनेचे प्रयत्न सुरु असताना प्रत्यक्ष दुकानांवरील पाट्याही मराठीत दिसत नाहीत. राज्यातील दुकानावरील पाट्या मराठीत असण्याबाबतचा नियम असूनही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. या पार्श्वभूमीवर या नियमाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरत आज राज्य मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत.

दुकानावरील पाट्या मराठीत असायला हव्यात ही राज्यातील मराठी माणसाची किमान अपेक्षा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यातील दुकानांच्या पाट्या  मायमराठीत असाव्यात, असा नियम अस्तित्त्वात असूनही दुकानदार त्यापासून पळवाट काढत असतात. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असते. तर  मराठीत मात्र लहान अक्षरात नावे असतात. 

मात्र राज्य सरकारच्या आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढेच मोठे, ठसठशीत दिसेल असे ठेवावे लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती आज मंजूर करण्यात आली.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. 

त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT